शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीत कोरोनाचे १३ हजार ३९० रुग्ण, ९४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:24 IST

अमरावती : फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात १३ हजार ३९० जणांना कोरोनाची लागण झाली, तर ९४ जणांचा कोरोनाने बळी घेतल्याची नोंद ...

अमरावती : फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात १३ हजार ३९० जणांना कोरोनाची लागण झाली, तर ९४ जणांचा कोरोनाने बळी घेतल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली. फेब्रुवारीत कोरोना संक्रमितांची वाढलेली आकडेवारी बघता याच महिन्यात समूह संसर्गाचा धोका होता, हे स्पष्ट होते.

गत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाबाधित आणि मृत्यूसंख्या कमी होती. मात्र, ८ ते १४ फेब्रुवारी या दरम्यान बाधितांची संख्या वाढत गेली. पुढे १५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान संक्रमित रुग्ण आणि कोरोनाने बळी घेणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत गेल्याची आकडीवारी आहे. कोरोना बाधितांचा वेग वाढत असल्याने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निर्णयानुसार २२ फेब्रुवारीपासून अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिका हद्दीत ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले. मात्र, या आठ दिवसांत ५,५९३ बाधित, तर ४८ रुग्णांना कोरोनाने जीव गमवावा लागला. परिणामी जिल्हा प्रशासनाने पुन्हा १ मार्चपासून नव्याने लॉकडाऊन घोषित केले. मात्र, मार्च महिन्यात तीन दिवसांत फेब्रुवारीच्या तुलनेत कोरोना संक्रमित आणि मृत्यू संख्या काही प्रमाणात ओसरत चालली आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊनचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेतील गर्दी कमी होत नसल्याचे वास्तव आहे. वाहनांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून, कोराेना नियमावलींचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा ठपका जिल्हा प्रशासनाने ठेवला. त्रिसूत्रीचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

------------------

फेब्रुवारीत बाधित अन्‌ मृत्यूसंख्या

१ ते ७ फेब्रुवारी : १४७८ रूग्ण, ६ मृत्यू

८ ते १४ फेब्रुवारी : २२३७ रुग्ण, १२ मृत्यू

१५ ते २१ फेब्रुवारी : ४०६३ रूग्ण, २८ मृत्यू

२२ ते २८ फेब्रुवारी : ५५९३ रुग्ण, ४८ मृत्यू