बापमाणूस! पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी पित्याची ७० फूट खोल विहिरीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 21:54 IST2021-03-13T21:48:10+5:302021-03-13T21:54:23+5:30

Father Save Son : मोठ्या भावासोबत खेळताना मुलगा विहिरीत पडल्याचे कळताच वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता ६० ते ७० फूट खोल विहीरीत उडी घेतली.

Father's jump into a 70 feet deep well to save the Son | बापमाणूस! पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी पित्याची ७० फूट खोल विहिरीत उडी

बापमाणूस! पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी पित्याची ७० फूट खोल विहिरीत उडी

अमरावती - मोठ्या भावासोबत खेळताना  साडेचार वर्षाचा मुलगा अचानक अपार्टमेंटमधील विहिरीत कोसळला. ही माहिती कानी पडताच क्षणाचाही विलंब न करता ७० फूट खोल विहिरीत उडी घेतली. या दोघांनाही महापालिकेच्या रेस्क्यू टीमने बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून खोल पाण्यात या बाप-लेकांनी तग धरला. (Father's jump into a 70 feet deep well to save the Son )

 मनीष सोपानराव मानकर (३८, रा. अभिनव कॉलनी) असे जिवाची बाजी लावणाऱ्या वडिलांचे, तर मनस्व असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शेगाव नाकानजीक अभिनव कॉलनीतील साईतिर्थ अपार्टमेंटमध्ये शनिवारी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. 
 मनस्व विहिरीत पडल्याची माहिती त्याचा  मोठा भाऊ आर्यनने वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता ६० ते ७० फूट खोल विहीरीत उडी घेतली. आधी त्यांना मनस्व दिसून आला नाही. मात्र त्यांनी पाण्यात पुन्हा बुडी घेतल्यानंतर मनस्वचा पाय त्यांच्या हातात लागला. त्यांनी मनस्वला जवळ घेतले आणि कपारीचा आधार घेत पाण्यावर आले. तोपर्यंत विहिरीजवळ अपार्टमेंटमधील  नागरिकांनी गर्दी केली होती. विहिरीत वडील व मुलगा जीवंत आहे किवा नाही, हे कुणालाही कळत नव्हते. 

दरम्यान, भ्रमध्वनीवरून माोरे नामक व्यक्तीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या रेस्क्यू टीमला माहिती दिली. त्यांनीही दोन किंमीचे अंतर पाच मिनिटात गाठले. विहिरीत दोरीची शिडी सोडून एका जवानाने त्यावरून उतरून मनस्वला काठावर आणले. त्यानंतर मनीष मानकर हे शिर्डीच्या आधाराने विहिरीबाहेर आले. मुलाला जवळच्या फॅमिली डॉक्टरकडे उपचाराकरिता नेण्यात आले होते. दोघांना वाचविणाऱ्या रेस्क्यू टीममध्ये अभिषेक निंभोरकर, सूरज लोणारे, अमोल साळुंखे, हर्षद दहातोंडे, जयकुमार वानखडे, शुभम जाधव यांचा समावेश होता.

आणि आकांत शमला

मनस्व ७० फूट खोल विहिरीत कोसळल्याचे कळताच त्याच्या आईचा आकांत पराकोटीला गेला होता त्याचे वाईट होऊ नये, तो सुखरूप असावा, यासाठी प्रत्येक देवाचा धावा करीत होती. मनस्व सुखरूप परतल्यानंतर पटापट पापे घेत माऊलीने त्याला मिठीत घेतले.

Web Title: Father's jump into a 70 feet deep well to save the Son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.