‘आप’चे जिल्हा कचेरीसमोर उपोषण

By Admin | Updated: August 13, 2015 01:02 IST2015-08-13T01:02:09+5:302015-08-13T01:02:09+5:30

जिल्हा सामान्य रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी आम आदमी पक्षाचे वतीने...

Fasting in front of AAP's district office | ‘आप’चे जिल्हा कचेरीसमोर उपोषण

‘आप’चे जिल्हा कचेरीसमोर उपोषण

लक्षवेध : विविध मागण्या सोडविण्याची मागणी
अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी आम आदमी पक्षाचे वतीने बुधवारपासून जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात कामगारांना महाराष्ट्र अधिनियम १९४८ अंतर्गत वेतन देण्यात यावे, शिक्षण विभागातील भोंगळ कारभार बंद करावा, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंप जोडणीचे कनेक्शन त्वरीत देण्यात यावी, एपीएल रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्यासाठी आपने जिल्हाकचेरी समोर उपोषण सुरू केले आहे.
उपोषण कर्त्यानमध्ये किशोर वानखडे, सुधीर तायडे, मारोती बागडे, महेश देशमुख, रंजना मामर्डे, सुरेश मुंदडा, रवींद्र कावरे, अ. बशिर शेख, संजय शहाकार, रितेश तिवारी, सुभाष देशमुख, प्रमोद कुचे, किरण गुडधे, नितीन उजगावकर, चक्रधर पाटील वीरेंद्र उपाध्याय यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी आदीचा समावेश होता.

Web Title: Fasting in front of AAP's district office