शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘पीएम किसान सन्मान’साठी शेतकरी प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 6:00 AM

योजनेसाठी खातेदार शेतकऱ्यांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात १ लाख ५२ हजार ९०१ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता पाठविण्यात आला. यापैकी १ लाख ४२ हजार ४७४ शेतकऱ्यांना हे मानधन मिळाले, तर उर्वरित ८ हजार ८६० शेतकऱ्यांना त्रुटीमुळे ही रक्कम मिळू शकलेली नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । बहुतेकांना पहिलाच हप्ता नाही; वर्षभरापासून प्रक्रिया, हेलपाट्यांना नाही पारावार

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली. या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३९ हजार ७०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. हा डेटा केंद्र शासनालादेखील पाठविण्यात आला. यापैकी बहुतेकांना दोन हजारांचा पहिला हप्ताच मिळालेला नाही. शेतकरी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत.केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात प्रत्येकी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी जिल्ह्यात २,३९,७०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्हा प्रशासनाने हा डेटा केंद्र शासनाला पाठविला. यामध्ये ८,१६५ शेतकºयांच्या माहितीत त्रुटी आढळून आल्यात. यापैकी ११९ शेतकऱ्यांनी मागील महिन्यापर्यंत त्रुटीची पूर्तता केली असली तरी अद्यापही ८,०४६ शेतकऱ्यांची माहिती अपूर्णच आहे. त्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.योजनेसाठी खातेदार शेतकऱ्यांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात १ लाख ५२ हजार ९०१ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता पाठविण्यात आला. यापैकी १ लाख ४२ हजार ४७४ शेतकऱ्यांना हे मानधन मिळाले, तर उर्वरित ८ हजार ८६० शेतकऱ्यांना त्रुटीमुळे ही रक्कम मिळू शकलेली नाही.दुसऱ्या टप्प्यात १ लाख २७ हजार ६९८ शेतकऱ्यांना मानधन पाठविण्यात आले. यापैकी १ लाख १८ हजार ३९८ शेतकºया हे मानधन मिळाले. उर्वरित १०६ शेतकऱ्यांच्या खात्यात हे मानधन जमा झालेले नाही.तिसऱ्या टप्प्यात ६५ हजार ८८ शेतकऱ्यांना मानधन पाठविण्यात आले. यापैकी ४६ हजार १२ शेतकऱ्यांच्या खात्यात मानधन जमा झाले, तर ५४ शेतकऱ्यांना त्रुटीमुळे हे मानधन जमा झाले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.पाच टक्के लाभार्थींची पडताळणीयोजनेचे अंमलबजावणी प्रमुख तथा राज्याचे कृषी आयुक्त यांच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेल्या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये २.५ टक्के नावे केंद्र शासनस्तरावरून देण्यात आली, तर २.५ टक्के लाभार्थी निवड जिल्हाधिकाऱ्यांना करावयाची होती. त्यानुसार डिसेंबर महिन्यात या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यानंतरही वंचित शेतकऱ्यांना मानधन मिळालेले नाही.योजनेत तालुकानिहाय शेतकरी सहभागयोजनेमध्ये अचलपूर तालुक्यातील १९ हजार ५५० शेतकरी, अमरावती १४ हजार २३२, अंजनगाव सुर्जी १८ हजार ४०३, भातकुली १३ हजार ९६२, चांदूर रेल्वे १२ हजार ८०७, चांदूर बाजार २१ हजार १०९, चिखलदरा १२ हजार ४१५, दर्यापूर १९ हजार ६५०, धामणगाव रेल्वे १७ हजार ६८७, धारणी १५ हजार ७८५, मोर्शी १८ हजार ७४१, नांदगाव खंडेश्वर १८ हजार २०८, तिवसा १५ हजार ९९४ आणि वरूड तालुक्यातील २१ हजार ९९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना