शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वलगाव येथील शेतकर्‍यांची जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: May 18, 2014 23:14 IST

अमरावती : मौजा वलगाव शेत शिवारात नांदगाव पेठ येथील पॉवर ट्रान्समिशन कंपनीने मनोर्‍यावर तारा टाकून शेतजमिनीवर पसरविल्या आहेत. यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेती कामे

 अमरावती : मौजा वलगाव शेत शिवारात नांदगाव पेठ येथील पॉवर ट्रान्समिशन कंपनीने मनोर्‍यावर तारा टाकून शेतजमिनीवर पसरविल्या आहेत. यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेती कामे करण्यास अडथळा निर्माण होेत आहे. याशिवाय नुकसान भरपाई दिली नसल्याने शनिवारी अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. पॉवर ट्रान्समिशन कंपनीच्या वतीने मौजा वलगाव शेतशिवारात वीज वाहिनी टाकण्यासाठी मनोर्‍यावर वीज तारा टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी विविध शेतकर्‍यांच्या शेतात वीज तारा पसरवून ठेवल्या असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याशिवाय खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतात मशागतीची कामे करण्यास शेतकर्‍यांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच मनोर्‍यासाठी शेतकर्‍यांच्या शेतातील जागा सदर कंपनीने घेतली. यापोटी प्रत्येकी ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे कंपनीने मान्य केले; मात्र अद्यापही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही अमरावती पॉवर ट्रान्समिशन कंपनीने शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानाची भरपाई दिली नाही. तसेच शेतात अडथळा निर्माण होत असल्याने पसरविलेल्या तारा काढून टाकाव्यात, अशी मागणी वलगाव येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अंकुश कल्हाने, प्रफुल्ल वसू, अब्दुल रशिद, वसंत घाटोळ, सुधीर निर्मळ, मनुबाई बोबडे, ज्ञानेश्वर निर्मळ, वच्छला सोळंके, आनंद ढगे, नंदकिशोर पुरीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)