अमरावतीमधील शेतक-याच्या मुलाची गरुडझेप, नेहाल खडसे खेळणार अंडर १९ ज्यूनिअर लिगमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 20:53 IST2017-09-16T20:40:07+5:302017-09-16T20:53:52+5:30

अ-हाड-कु-हाड गावातील नेहाल खडसे याची दिल्ली संघातर्फे श्रीलंका येथे आयोजित अंडर १९ आयपीएल २०१७  क्रिकेट संघात निवड झाली आहे

Farmer's son from Amravati will play Garuda's, Nehal Khadse under-19 junior lig | अमरावतीमधील शेतक-याच्या मुलाची गरुडझेप, नेहाल खडसे खेळणार अंडर १९ ज्यूनिअर लिगमध्ये 

अमरावतीमधील शेतक-याच्या मुलाची गरुडझेप, नेहाल खडसे खेळणार अंडर १९ ज्यूनिअर लिगमध्ये 

अमरावती, दि. 16 - येथून जवळच असलेल्या अ-हाड-कु-हाड गावातील नेहाल खडसे याची दिल्ली संघातर्फे श्रीलंका येथे आयोजित अंडर १९ आयपीएल २०१७  क्रिकेट संघात निवड झाली आहे. अवघ्या १७ वर्षांचा नेहाल याने अकोला, नागपूर, पुणे, मुंबर्ई व दिल्ली येथे आयोजित क्रिकेट संघात ऑलराऊंडर म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याने त्याची अंडर १९ सब ज्युनिअर लीगमध्ये निवड करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी शांताराम खडसे यांचा मुलगा नेहाल याला अवघ्या ७ वर्षांपासून क्रिकेटचा छंद लागला. आजतागायत त्याने विविध ठिकाणी खेळलेल्या सामन्यात यश संपादन केले व मेडलसुद्धा मिळविले. गावकुसाबाहेर खेळून आपले स्वप्न रंगववीत असलेल्या नेहालचे स्वप्न अगदी खरे ठरले असून तो आता अंडर १९ आयपीयल ज्यूनियर लिग २०१७ साठी श्रीलंकेला १३ ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहे. तो एकमेव विदर्भातील खेळाडू आहे. इतक्या कमी वयात तो परदेशात जात आहे, हे अवघ्या विदर्भासाठी भूषणावह आहे. नेहाल हा सध्या श्री राम मेघे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा सिव्हील इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकत आहे. आई-बाबा शेतकरी आहे.

Web Title: Farmer's son from Amravati will play Garuda's, Nehal Khadse under-19 junior lig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.