धामणगाव तालुक्यात ओलीत करताना शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 18:58 IST2019-12-18T18:57:47+5:302019-12-18T18:58:22+5:30
रात्री उशिरा ग्रामस्थांनी त्यांचा शेतात शोध घेतला असता, सदर घटना उघडकीस आली.

धामणगाव तालुक्यात ओलीत करताना शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू
अमरावती - धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपूर येथे मंगळवारी रात्री शेतात सिंचन करीत असलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. गजेंद्र आनंदराव भोंगे (५०) असे मृताचे नाव आहे. ते मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास स्वत:च्या साडेपाच एकर शेतात कपाशीचे ओलित करीत होते. दरम्यान पाण्यातून संचारलेल्या वीज प्रवाहाचा जबर धक्का लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा ग्रामस्थांनी त्यांचा शेतात शोध घेतला असता, सदर घटना उघडकीस आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, नागपुरात अधिवेशनाला उपस्थित आमदार प्रताप अडसड यांना ही घटना माहिती पडताच त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याची सूचना केली. एकीकडे सोयाबीन, कपाशीची नापिकी झाली तरी भरपाई मिळाली नाही. त्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली. वीज मंडळ करीत असलेल्या दिवसाच्या भारनियमनाचा सदर शेतकरी बळी ठरला असून, शासनाने त्वरित आपद्ग्रस्त कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी आ. अडसड यांनी केली.