अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:40 IST2020-05-22T19:38:18+5:302020-05-22T19:40:25+5:30
मोर्शी तालुक्यातील पाळा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश ठोके, असे मृताचे नाव आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: मोर्शी तालुक्यातील पाळा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश ठोके, असे मृताचे नाव आहे.
रमेश ठोके यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यात त्यांना यंदा संत्र्याचे उत्पादन जेमतेम झाले. लॉकडाऊनमुळे त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही. अस्मानी संकटासमोर माना टाकलेली संत्राझाडे टिकविण्यासाठी व तोंडावर आलेल्या खरिपात पेरणी करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नव्हता. त्यामुळे ते अस्वस्थ होते.
शेतात जातो म्हणून रमेश ठोके हे २१ मे रोजी घराबाहेर पडले. घरी परतले नाही म्हणून शोधाशोध करण्यात आली. अखेर शुक्रवारी त्यांच्याच शेतातील निंबाच्या झाडाला त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची एक चमू घटनास्थळी रवाना झाली. मृतदेह शवविच्छेदनाकरिता मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.