शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

जानेवारीपश्चात वैरण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:28 IST

जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळस्थिती शासनाने जाहीर केली असली तरी सर्वच तालुक्यांत हीच स्थिती कायम आहे. जिल्ह्यातील ८ लाख पशुधनाला किमान जानेवारीपर्यंत पुरेल एवढ्या वैरणीची तजवीज तूर्तास आहे. त्यानंतर मात्र वैरण टंचाईची झळ पोहोचणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : आठ लाख पशुधन, चाराटंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळस्थिती शासनाने जाहीर केली असली तरी सर्वच तालुक्यांत हीच स्थिती कायम आहे. जिल्ह्यातील ८ लाख पशुधनाला किमान जानेवारीपर्यंत पुरेल एवढ्या वैरणीची तजवीज तूर्तास आहे. त्यानंतर मात्र वैरण टंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग पुढे सरसावला आहे. वैरणटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी आता कालबद्ध कार्यक्रमाद्वारे नियोजन सुरू आहे.१९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात सहा लाख ५० हजार २२८ पशुधन आहेत. याव्यतिरिक्त शेळ्या ७२,०५४ व मेंढ्या २,८१,२९० आहेत. या सर्व गुरांना जानेवारीपर्यंत पुरेल एवढ्या वैरणाची जिल्ह्यात तजवीज आहे. सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे कुटाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता अपुऱ्या पावासामुळे जमिनीत आर्द्रता नसल्याने रबी हंगामदेखील धोक्यात आलेला आहे. सोयाबीन, गहू व तुरीच्या कुटाराची साठवण हीच जिल्ह्यातील जिरायती शेतकºयांची उन्हाळ्यासाठी बेगमी असते. मात्र, यंदा विपरीत स्थिती असल्याने वैरणाची साठवण होऊ शकली नाही. जिल्ह्यात हायब्रिड किंवा गावरान ज्वार आता कालबाह्य ठरत असल्याने कटबा किंवा कुट्टीदेखील नाही. यामुळे वैरणटंचाईचा दाह यंदा चांगलाच जाणवणार आहे.शासनाने दुष्काळसदृश तालुके जाहीर केल्याने त्या तालुक्यांत चाराटंचाई उद्भवणार आहे. यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या पशुपालकांसाठी वैरण बियाणे व खतांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रति १० गुंठ्यांकरिता ४६० रूपयांपर्यंत, तर एक हेक्टरकरिता अधिकतम ४,६०० रूपये १०० टक्के अनुदानाची मर्यादा आहे. यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. या योजनेमध्ये मका पाच किलो व ज्वारी चार किलो बियाणे देण्यात येणार आहे. यामध्ये मक्याचे किमान ५००० व ज्वारीचे ४५०० किलो हिरव्या वैरणाचे उत्पादन अपेक्षित असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.तालुका समितीचे मॉनिटरिंगसद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचा परिणामकारकरित्या चारा उत्पादनाकरिता उपयोग होण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांची निवड व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेत समिती योजनेचे मॉनिटरींग होणार आहे. यामध्ये तालुक्यांचे पशुधन विकास अधिकारी सचिव, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी सदस्य आहेत.अशी होणार लाभार्थ्यांची निवडपशुपालकाकडे चारा लागवडीकरिता पुरेसे क्षेत्र उपलब्ध होण्याची खात्री करण्यासाठी जमिनीचा सात-बारा, अर्जासोबत घेण्यात येणार आहे. तसेच पशुपालकाकडे विहीर, बोअरवेल, शेततळे, कालवा अदींची सिंचन सुविधा असल्याची खात्री करण्यात येणार आहे. बियाण्यांची किंमत वगळता उर्वरित रक्कम पशुपालकांच्या बँक खात्यात १० दिवसांत डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.वैरण टंचाई निवारणासाठी ७० टन मका व बाजरा बियाण्यांचे सध्या वाटप सुरू आहे. गावपातळीवर सर्वेक्षण व लाभार्थ्यांना अर्ज वाटप करण्यात येत आहे. वर्षभर हिेरवा चारा उपलब्ध होण्यासाठी १८ लाख ठोंब्याचे वाटप करण्यात आले असून सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहे.- डॉ. विजय राहाटे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी