शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:14 IST

अमरावती : कपाशीच्या फरदळीमुळे बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नसल्याने पुढीलवर्षीसुद्धा पुन्हा बोंडअळीचा धोका वाढत असल्याने कपाशीची फरदड न ...

अमरावती : कपाशीच्या फरदळीमुळे बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नसल्याने पुढीलवर्षीसुद्धा पुन्हा बोंडअळीचा धोका वाढत असल्याने कपाशीची फरदड न घेण्याचे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.

फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यांनतर सिंचन उपलब्ध असलेल्या ठिकाणी कपाशीच्या शेतात पाणी देऊन पुनश्च कापूस पीक घेणे होय. अशावेळी पिकापासून जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशकांचा वापर करून मार्च महिन्यानंतरही कापूस उत्पादन घेतले जातात.

डिसेंबरनंतर कपाशीचे पीक ठेवल्यास गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळते आणि अळीच्या जीवनक्रमाच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होते. तसेच बीटी. प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारकता निर्माण होते. डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील पाच ते सहा महिने कापूस पीक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते व त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्तावस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहुन पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापुस पिकावर अळीचा पुन्हा प्रादुर्भाव होतो. या कारणास्तव कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड घेऊ नये. याकरिता कापुस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा (श्रेडरचा) वापर करावा आणि तयार झालेल्या पिकाचा चुरा गोळा करून सेंद्रीय खतात रुपांतरित करावे. पीक काढणीनंतर खोल नांगरटी करून जमीन उन्हात चांगली तापु द्यावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे पुढील खरीप हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखता येत आसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विजय चवाळे यांनी सांगितले.

बॉक्स

कपाशीचे अवशेष नस्ट करणे महत्त्वाचे

फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते, फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येवून गुलाबी बोंड अळीला तसेच मावा, तुडतुडे, पांढऱ्या माशीला खाद्य उपलब्ध होते. पर्यायाने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आणखी मोठया प्रमाणावर होतो. डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाट्या किंवा वाळलेल्या नख्यामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असुन पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्या शेतातील अवशेष नष्ट करणे आवश्यक आहे.

बॉक्स

बीटीतील प्रथिनांच्या प्रमाणात घट

फरदड कपाशीत लागाणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही, त्यामुळे धाग्याची मजबुती व रुईचा उतारा घटून कापसाला बाजारभाव कमी मिळतो. कापसाची फरदड घेतल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. कापुस पिकाचा कालावधी वाढत जातो त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बोंडअळ्यामध्ये बीटी प्रथिनाविरुध्द प्रतिकारक्षमता निर्माण होते. त्यामुळे पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त राहण्याची शक्यता आहे.