शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

करबुडव्या सन्मित्र नागरी पतसंस्थेला ठोकले सील

By admin | Updated: March 11, 2015 00:26 IST

येथील सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेने महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरल्यामुळे या संस्थेला सील ठोकण्यात आले.

बडनेरा : येथील सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेने महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरल्यामुळे या संस्थेला सील ठोकण्यात आले. इतर ठिकाणी एकाच दिवशी राबविलेल्या धडक मोहिमेतून ३ लाख ३४ हजार रुपयांचा मालमत्ता कर वसुल करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त योगेश पिठे यांनी दिली. आठवडी बाजारस्थित सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेकडे २००५-०६ वर्षीपासून ३२ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता. मनपाने थकित कराचा भरणा तत्काळ करावा, अशी नोटीेस पतसंस्थेला दिली होती. मात्र, थकित कराचा भरणा न केल्यामुळे ९ मार्च रोजी मनपाचे सहाय्यक आयुक्त योगेश पीठे यांच्या नेतृत्वातील पथकाने सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेला सील ठोकले. त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी थकित असणाऱ्या मालमत्ता करापोटी ३ लाख ३४ हजार रुपयांचा कर या पथकाने एकाच दिवशी वसुल केलेला आहे. बडनेऱ्यातील मनपाच्या दक्षिण झोन कार्यालयाला ८ कोटी ७५ लाख रुपयांचे मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट आहे. यापैकी ६ कोटींच्या वर मालमत्ता कर वसुल झालेला आहे. या कारवाईत सहायक आयुक्त योगेश पीठे, क्षेत्रिय अधिकारी मंगेश वाटाणे, संतोष येलगुंडे, कर निरीक्षक आर. एस. देशमुख, श्रीवास्तव, स्वास्थ निरीक्षक एकनाथ कुळकर्णी, वसुली लिपिक पाल यांच्यासह इतरही मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.