लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या धाडसत्रात मध्यप्रदेशातील ४२,३०० रूपयांची बनावट विदेशी दारू शनिवारी जप्त केली. याप्रकरणी अमोल पंजाबराव मदने (२५, रा. ब्राम्हणवाडा थडी) असे ताब्यातील आरोपीचे नाव आहे.एक्साईजच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून बनावट विदेशी मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे भरारी पथकाने चिंचोली ते ब्राम्हणवाडा थडी मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान अमोल मदने हा मध्यप्रदेशातून दुचाकीने येत असल्याचे पथकाला दिसून आला. वाहनासह त्याची झाडाझडती घेतली असता ४२ हजार ३०० रुपयांचा बनावट विदेशी मद्य साठा जप्त करण्यात आला. आरोपी मदने याला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले असून दारूबंदी कलमाखाली गुन्हे नोंदविले आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातून बनावट दारूची तस्करी होत असल्याचे स्पष्ट होते. ही कारवाई एक्साईजच्या राज्य अधीक्षक उषा वर्मा, नागपूर विभागाचे उपायुक्त एम.एस. वर्दे, अमरावतीचे अधीक्षक राजेश कावळे, उपअधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाने केली आहे.६५ हजारांची देशी दारू जप्त; दोघांवर गुन्हेअंजनगाव सूर्जी तालुक्यातील सातेगाव येथे अवैध दारू विक्री अड्ड्यावर एक्साईजच्या फिरत्या पथकाने धाड टाकली. यात देशी दारूच्या २४ पेट्यांसह १८९ मि.ली. क्षमतेच्या १११६ बाटल्या असा ६५ हजार ६१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रवींद्र शालीकराम जयस्वाल (४६) व विनोद शालीकराम जयस्वाल (४५) या दोघांविरूद्ध दारूबंदी कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे. ही कारवाई एक्साईजचे प्रभारी निरीक्षक अनिस शेख, दुय्यम निरीक्षक कृष्णकांत पुरी, सुमित काळे, सतीश बंगाळे, रूपेश मोकळकर आदींनी केली आहे.
'एमपी'तील बनावट दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:01 IST
एक्साईजच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून बनावट विदेशी मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे भरारी पथकाने चिंचोली ते ब्राम्हणवाडा थडी मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान अमोल मदने हा मध्यप्रदेशातून दुचाकीने येत असल्याचे पथकाला दिसून आला. वाहनासह त्याची झाडाझडती घेतली असता ४२ हजार ३०० रुपयांचा बनावट विदेशी मद्य साठा जप्त करण्यात आला.
'एमपी'तील बनावट दारू पकडली
ठळक मुद्देएक्साईजची कारवाई : एकास अटक, ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त