शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By admin | Updated: June 18, 2014 23:52 IST

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा मोहक्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तो पोलिसांना दोन महिन्यांपासून हुलकावणी देत होता. सोमवारीही तो पोलिसांच्या हातावर

दर्यापूर/लेहेगाव रेल्वे : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा मोहक्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तो पोलिसांना दोन महिन्यांपासून हुलकावणी देत होता. सोमवारीही तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इंडिका कार सोडून पसार झाला होता.अमरावतीच्या हैदरपुरा येथील शेख वसीम शेख मकसूद ऊर्फ वसीम चायना याला बुधवारी दुपारी १२ वाजता दर्यापूर येथील शिवाजी चौकातून दर्यापूर पोलिसांनी अटक केली. यापूर्वी पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील सदस्यांना मुद्देमालासह अटक केली आहे. वसीम चायना १७ मे पासून पोलिसांना हुलकावणी देत होता. ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दर्यापूर येथील श्रीकृष्ण रायबोले याच्या घराची झडती घेऊन त्याला अटक केली होती. त्याच्या घरातून २ लाख ९ हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतर तोंगलाबाद येथील रहिवासी व कारंजा लाड येथे डाक विभागात कार्यरत सचिन शंकरपुरे याला अटक करुन त्याच्या ताब्यातून पाचशे रुपयांच्या ५० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यानंतर १७ मे रोजी सायंकाळी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावतीच्या पंचवटी चौकात सापळा रचला; मात्र टोळीचा प्रमुख वसीम चायना दुचाकी वाहनाने पसार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी गाडगेनगर पोलिसांनी वलगाव मार्गावरील एका हॉटेलसमोरुन वसीमची दुचाकी ताब्यात घेतली होते. ही दुचाकी दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केली.हे प्रकरण दर्यापूर न्यायालयात सुरु असल्याने पसार वसीम हा मंगळवारी दर्यापूर न्यायालयात जामीन मिळण्यासाठी हजर होणार असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेला प्राप्त झाली.