महिनाभरापासून आय ओटी बंद; 'इर्विन'मधील नेत्र शस्त्रक्रियांना ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:06 IST2024-12-09T11:05:51+5:302024-12-09T11:06:45+5:30

Amravati : इमर्जन्सी रुग्णांना केले जाते पीडीएमसीमध्ये रेफर

Eye OT off for a month; Eye surgeries break in 'Irvine' | महिनाभरापासून आय ओटी बंद; 'इर्विन'मधील नेत्र शस्त्रक्रियांना ब्रेक

Eye OT off for a month; Eye surgeries break in 'Irvine'

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील आय ओटी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बंद आहे. या ओटी परिसरात सुरू असलेल्या नव्या आयसीयू इमारतीच्या कामकाजामुळे येथे होणाऱ्या मोतीबिंदू, तसेच इतर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत, त्यामुळे ज्या रुग्णांची इमर्जन्सी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. अशा रुग्णांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रेफर करण्यात येत असल्याची माहिती आहे. 


जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डोळ्यांच्या ओपीडीमध्ये रोज ७० ते ८० रुग्ण हे उपचारासाठी येतात. यामध्ये वयोवृद्ध रुग्णांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. यामध्ये मोतीबिंदूमुळे दिसण्याचा त्रास असलेल्या रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियादेखील याच ठिकाणी करण्यात येतात. रोज सरासरी २० ते २५ रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात होतात, तर महिन्याला जवळपास सहाशे ते सातशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होतात, जिल्ह्यात केवळ इर्विन या शासकीय रुग्णालयातच डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होत असल्याने येथे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथील नेत्र विभागातील कामाची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने या विभागाला गौरविण्यात आले होते; परंतु एक महिन्यापासून येथील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंद आहेत. आय ओटी परिसरातच ५० खाटांच्या आयसीयू इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे येथील धूळ आय ओटीमध्ये येत असल्याने या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील आय ओपीडी सुरु करण्याची मागणी होत आहे.


"आय ओटीजवळच आयसीयू इमारतीचे काम सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी उडणाऱ्या धुळीमुळे तात्पुरत्या स्वरुपात आय ओटी बंद ठेवण्यात आली आहे. लवकरच ओटी सुरु करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील."
- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक

 

Web Title: Eye OT off for a month; Eye surgeries break in 'Irvine'