शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात स्फोटकांच्या टाक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:48 IST

शहरात अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांलगत भीषण स्फोट घडवून आणण्याची क्षमता असलेल्या स्फोटकांच्या टाक्या आहेत.

ठळक मुद्देस्थानांतरण केव्हा ? : हजारो नागरिकांच्या जिविताशी खुलेआम खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांलगत भीषण स्फोट घडवून आणण्याची क्षमता असलेल्या स्फोटकांच्या टाक्या आहेत. हजारो नागरिकांच्या जिविताशी हरघडी होत असलेला हा मृत्यूखेळ 'ब्लू व्हेल गेम'पेक्षाही भयानक म्हणावा असाच आहे. एका लहानशा चुकीने क्षणात मृतदेहांचा खच पाडू शकणाºया या स्फोटकांच्या टाक्या केवळ प्रशासनाच्या 'मेहेरबानी'मुळेच वर्दळीच्या ठिकाणी शाबूत आहेत.केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार पेट्रोलपंप सुरु करण्यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून मालकांना ‘एनओसी’ची लांबलचक यादी सादर केली जाते. नाहरकत प्रमाणपत्रांशिवाय पेट्रोलपंपांना परवानगी मिळत नाही. मात्र, ४० ते ५० वर्षांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांचे नियम शिथिल असताना परवानगीप्राप्त पेट्रोलपंप आता धोकादायक ठरू लागले आहेत. काही पेट्रोलपंपांच्या इंधन टाक्या रस्ता डांबरीकरणात गेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यालगत अनेक पेट्रोलपंप आहे. यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होतो. यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांचा समावेश आहे. नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण करून हे पेट्रोलपंप सुरू असताना जिल्हा प्रशासन गप्प आहे. ग्राहकांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसणारे पेट्रोलपंप पेट्रोलियम वर्ग-१ नुसार बंद करण्याची कारवाई जिल्हाधिकाºयांना करता येते. तरीही धोकादायक पेट्रोलपंपांना अभय का, हा प्रश्न उरतोच. पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ असल्याने केव्हाही मोठा अपघात संभवतो. खासगी जागेवर पेट्रोलपंप असल्याचे सांगून मालक वेळ मारून नेत आहेत. जिल्ह्यात एकूण १३६ पेट्रोलपंप असून यात ग्रामीण भागात ११८ तर शहरात १८ पेट्रोलपंपांची नोंद प्रशासनाकडे आहे.ग्राहकांशी निगडित असणाºया सुविधांसंदर्भात पेट्रोलपंप तपासणीचे निर्देश तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकाºयांना दिले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जाईल. याबाबत गय केली जाणार नाही.-अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारीनव्या पेट्रोलपंपासाठी १० ते १५ एनओसी लागतात. मात्र, ४० ते ५० वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या पेट्रोलपंपांमुळे सद्यस्थितीत वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा पंपांवरून डिझेलविक्री बंद आहे. त्यामुळे चारचाकी वाहने येथे येत नाहीत. हे पेट्रोलपंप खासगी जागेवर सुरु आहेत.- हिमांशू केसरवानी,सेल्स अधिकारी, बीपीसीएल