शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बंजर माटी में पलकर भी हमने मृत्यू से जीवन खिंचा है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST

दर्यापूर/ येवदा : आपण सुरुवातीपासून कोविड-१९ शी लढाईत सर्वांत पुढच्या आघाडीवर होतो. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ दिसून येताना, ही ...

दर्यापूर/ येवदा : आपण सुरुवातीपासून कोविड-१९ शी लढाईत सर्वांत पुढच्या आघाडीवर होतो. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ दिसून येताना, ही लढाई निकराने व शथीर्ने लढण्याची गरज आहे. सर्वांच्या प्रयत्नांतून एक दिवस या महामारीवर निश्चित मात करू, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना पत्र लिहून व्यक्त केला आहे.

आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तिका अर्थात आशा या कोरोनायोद्ध्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात डॉ. रणमले यांनी या सर्वांच्या आतापर्यंतच्या अविरत श्रमाबद्दल आदर व्यक्त केला आहे. रुग्णसेवेहून दुसरे मोठे कार्य नाही. सैन्य जसे सीमेवर लढून देशाचे रक्षण करते, तसे आपण समाजातील अर्भकापासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या प्राणांचे संरक्षण करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून लढत आहात, अशा शब्दांत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचारी व आशाताईंचा गौरव केला आहे. बाधितांची वाढती संख्या पाहता, आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे ही लढाई शर्थीने लढणे आवश्यक आहे. प्रत्येक जण आपल्याकडे आशेचे किरण म्हणून पाहतो आहे. त्यामुळे त्यांच्या निरोगी जीवनासाठी त्यांच्या मनावर दक्षता त्रिसूत्री बिंबवणे, जीवनशैलीचा भाग होण्यासाठी ती सतत सांगत राहणे आवश्यक आहे. लक्षणे आढळलेल्यांना तपासणीसाठी पाठविणे आणि पॉझिटिव्ह आलेल्यांना उपचार मिळवून देत संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करून घेण्यासाठी तालुका कार्यालयांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक आहे. हे काम ‘आशाताईं’कडून होत असल्याने त्यांचा या लढाईतील योगदान मोलाचे आहे. पुढील लढाईही आम्ही शर्थीने आणि एकजुटीने लढू व एक दिवस कोरोनावर निश्चित मात करू.

असे केले आवाहन

‘हम उस माटी के वृक्ष नही, जिसको नदीयों ने सिंचा है, बंजर माटी में पलकर भी हमने मृत्यू से जीवन खिंचा है, मिटनेवाला नाम नही हमारा, एक दिन जरूर महामारीसे जितेंगे’, असा निर्धार व्यक्त करीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्वांना कोरोना लढाईत एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे.

-----------------------------