शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

विक्रीनंतरही संत्रा उत्पादकांना अतिरिक्त नफा; संत्र्यापासून ज्यूस निर्मिती, बॉटलिंग प्लांट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 15:15 IST

व्यापाऱ्यांशी सौदा झाल्यावर त्यांना केवळ चांगल्या दर्जाची फळांची विक्री व उर्वरित फळांवर प्रक्रिया करीत त्याचा ज्यूस बाजारात विक्री करून अतिरिक्त नफा कमविण्याची किमया अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादकांनी साधली आहे. 

- वीरेंद्रकुमार जोगी अमरावती : व्यापाऱ्यांशी सौदा झाल्यावर त्यांना केवळ चांगल्या दर्जाची फळांची विक्री व उर्वरित फळांवर प्रक्रिया करीत त्याचा ज्यूस बाजारात विक्री करून अतिरिक्त नफा कमविण्याची किमया अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादकांनी साधली आहे. संत्राबागांची खरेदी होत असताना केवळ पहिल्या व दुसऱ्या दर्जाचीच फळे व्यापारी नेतील, उर्वरित फळांवर प्रक्रिया करण्याचा निश्चय शिरजगाव कसबा येथील शेतकऱ्यांनी केला. यातूनच विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया अ‍ॅण्ड उद्योग प्रोड्युसर कंपनी उभी राहिली. शेतकरी मनोहर सुने, अशोक यावल, श्रीपाद आसरकर, सचिन यावले, प्रमोद कुऱ्हाळे, उषा रतीलाल सातपुते, विलास दामोदर, पवन निमकर, नीलेश राजस यांनी यासाठी पुढाकार घेतला. 

कंपनीमध्ये सुमारे पाचशेहून अधिक शेअरधारकांचा समावेश आहे. भागभांडवल व अनुदानातून प्रक्रिया उद्योग उभा राहिला. कंपनीचा स्वत:च्या मालकीचा बॉटलिंग प्लांट असून ‘ऑरेंज एनर्जी’ हे ज्यूस ब्रँड बाजारात उपलब्ध झाले. पूर्वी शेतकऱ्यांच्या बागांतील संत्र्यांची छाटनी केल्यावर ती फेकून दिली जात होती किंवा स्थानिक व्यापाºयांना त्याची विक्री केली जात होती. 

वेअरहाऊस उभारलेभागभांडवलधारक व ३० शेतकरीगट असे कंपनीचे हजाराहून अधिक सदस्य आहेत. कंपनीने शिरजगाव कसबा येथे वेअरहाऊस आहे. संत्रा व अन्य शेतमालाची साठवणूक येथे केली जाते. कंपनीचे अत्याधुनिक ज्यूस प्रक्रिया संयत्र असून याच ठिकाणी शेतमालसंबंधित अन्य उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कंपनीकडे सहा हजार स्केवअरफुटमध्ये ज्यूस सयत्र आहेत. 

शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम शेतमालास हमीभाव, बाजारपेठ मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगारांची संधी निर्माण करून देणे, शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, बी-बियाणे वाजवी दरात उपलब्ध करून देणे, वेअर हाऊसचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे यासह अनेक उपक्रम कंपनीच्या माध्यामतून राबविले जात आहेत.

शेतकऱ्यांना फायदा व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे. यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होईल. ज्यूस विक्रीतून शेतकऱ्यांना ५० टक्केपेक्षा अतिरिक्त नफा होणार आहे. वर्षभर संत्रा प्रक्रिया सुरू रहावी, असा आमचा प्रयत्न आहे.- मनोहर सुने, अध्यक्ष, विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया अ‍ॅण्ड उद्योग प्रोड्युसर कंपनी, शिरजगाव कसबा

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी