शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारीनंतरही चिंचेच्या महाकाय वृक्षाची कत्तल

By admin | Updated: October 8, 2015 00:10 IST

दर्यापूर नगर पालिकेच्या हद्दीतील स्थानिक आठवडी बाजारातील शासकीय गोदामाजवळ अज्ञाताने २०० ेवर्षांपूर्वीच्या चिंचेच्या महाकाय झाडाची हळूहळू करीत कत्तल केली.

दर्यापूर येथील प्रकार : दोषींवर कारवाईची मागणी उमेश होले दर्यापूरदर्यापूर नगर पालिकेच्या हद्दीतील स्थानिक आठवडी बाजारातील शासकीय गोदामाजवळ अज्ञाताने २०० ेवर्षांपूर्वीच्या चिंचेच्या महाकाय झाडाची हळूहळू करीत कत्तल केली. सदर इसम झाड तोडत असल्याची तक्रार स्थानिक प्रशासनाकडे परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अखेर हे झाड त्या इसमाने जमीनदोस्त केले. स्थानिक आठवडी बाजारात भले मोठे चिंचेचे झाड होते. त्या झाडाची सावली अनेक वर्षे वयोवृध्दांनी व लहान मुलांनी अनुभवली. परंतु येथीलच एका व्यक्तीला घराचा दुसरा माळा बांधताना हे झाड अडसर करीत असल्याने त्याने हळूहळू करून ते जमीनदोस्त करण्यास सुरूवात केली होती. चार दिवसांपूर्वी त्याने या झाडाच्या फांद्या कापल्या व झाड तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा याबाबतची माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य समन्वयक शेखर पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन येथील उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना ही माहिती दिली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी लगेच सबंधित मंडळ अधिकाऱ्याला घटनास्थळी पाठविले. इतकेच नव्हे, तर मुख्याधिकाऱ्यांनी देखील पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. तरीही त्या व्यक्तीला झाड तोडण्यापासून रोखले गेले नाही. शेवटी चिंचेचा महाकाय वृक्ष भुईसपाट झाला. खरे तर प्रशासनाने या वृक्षाचा त्वरित पंचनामा करून सबंधितांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा होता. परंतु तसे झाले नाही. अज्ञाताने हे झाड स्वार्थासाठी तोडून परस्पर विकल्याची परिसरात चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनातील जो कुणी दोषी असेल त्याच्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)