शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

‘रामगिरी’चे अतिक्रमण तोडले

By admin | Updated: January 3, 2015 00:26 IST

शहरातील मॉल्स, हॉटेल्स्, संकुलातून गायब झालेले वाहनतळ शोधून काढण्यासाठी पोलीस व महापालिका आयुक्तांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.

अमरावती : शहरातील मॉल्स, हॉटेल्स्, संकुलातून गायब झालेले वाहनतळ शोधून काढण्यासाठी पोलीस व महापालिका आयुक्तांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. याच श्रुंखलेत शुक्रवारी येथील बसस्थानक मार्गालगतच्या हॉटेल रामगिरीने गिळंकृत केलेले वाहनतळाचे अतिक्रमण तोडण्याची कारवाई करण्यात आली. वाहनतळ गायब झालेली ३५ प्रतिष्ठाने पहिल्या टप्प्यात असल्याची माहिती आहे.
महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. ज्या प्रतिष्ठानांच्या संचालकांनी बांधकाम मंजुरीच्या वेळी वाहनतळ असल्याचे नमूद केले होते, कालातंराने ही वाहनतळ गिळंकृत झालीत, अशी हॉटेल्स, मॉल्स, मंगल कार्यालये, संकुलाची शोधमोहीम सुरु हाती घेण्यात आली आहे. ज्या व्यावसायिकांनी वाहनतळ गायब केले आहे, अशांना नोटीस बजावून वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आठ दिवसांच्या आत वाहनतळ खुले झाले नाही तर मूळ नकाशा शोधून गडप केलेले वाहनतळ शोधण्यासाठी अतिक्रमण तोडले जाईल, असे कारवाईचे स्वरुप आहे. ज्या व्यावसायिकांनी वाहनतळाची जागा सोडली; मात्र वाहनतळाचे फलक लावले नाही त्या व्यावसायिकांना वाहनतळाचे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल्स, प्रतिष्ठाने, मॉल्स, मंगल कार्यालये आदींसमोर वाहने उभी असल्यास यापुढे ती वाहने वाहतूक पोलीस ताब्यात घेतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिक्रमण पथक कारवाईसाठी जाताना त्या प्रतिष्ठानचे मूळ नकाशे सोबत ठेवत असल्याची माहिती आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईत गंगाप्रसाद जयस्वाल, हेमंत महाजन, घनशाम वाघाडे, अजय विंचूरकर, गणेश कुत्तरमारे, उमेश सवाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मंगल कार्यालय, लॉन संचालकांना नोटीस
शहरात अव्वाच्या सव्वा दरात रक्कम आकारुन सुरू असलेले मंगल कार्यालये, लॉन संचालकांनी वाहनतळे गायब केल्याचे चित्र आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी येणाऱ्यांची वाहणे रस्त्यावरच उभी केली जातात. हा प्रकार सर्वच मंगलकार्यालये, लॉनबाबत लागू होत आहे. वाहनतळाची जागा सोडल्याशिवाय मंजुरी कशी मिळाली,ही शोधमोहीम सुरू आहे.
दुसऱ्या टप्प्यात संकुलविरोधात कारवाई
शहरात संकुले बांधकामाची परवानगी मिळविताना नकाशात वाहनतळाची जागा सोडण्याचे अंकित करण्यात आले होते. मात्र कालांतराने संकुलाच्या संचालकांनी वाहनतळाच्या जागेवर नव्याने गाळे निर्माण करुन त्या विकण्याचा धंदा चालविला आहे. परिणामी दुसऱ्या टप्प्यात वाहनतळाची शोध मोहीम सुरू होईल, अशी माहिती नगररचना विभागाने दिली आहे.
या प्रतिष्ठांनाचे अतिक्रमण तोडणार
वाहनतळाची जागा गायब करणाऱ्या ३५ प्रतिष्ठांनाची यादी तयार केली आहे. ज्यांनी वाहनतळाची जागा गिळंकृत केली अशा प्रतिष्ठांना नोटीस बजाखवली आहे. येत्या काही दिवसांत शिवाजी कमर्शियल कॉम्प्लेक्स, आॅयकॉन मॉल्स, ग़्रॅण्ड महेफिल, लढ्ढा मॉल्स, ईगल हॉटेल्स, सिटी कोतवाली पोलीस ठाण्यासमोरील संकुलातील वाहनतळांची शोधमोहीम घेत अतिक्रमण हटविले जाणार असल्याची माहिती आहे.