शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ९६ कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

गृहविभागाचे उपसचिव एन.एस. कराड यांनी ८ मे २०२० रोजी अधिसूचना जारी करून कैद्यांना इमर्जन्सी ४५ दिवसांचे पॅरोलवर सुटी देण्याबाबत गाइडलाइन दिली आहे. कोरोना कारागृहात शिरू नये, यासाठी गृह विभागाने उपाययोजना चालविल्या आहेत. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचा आधारानुसार समिती गठित करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे‘कोरोना’ इफेक्ट : नऊ मेपासून संचित रजेवर सोडण्याची प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे कारागृहात बंदीस्त असलेल्या कैद्यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ४५ दिवसांचा इमर्जन्सी पॅरोल मंजूर केला जात आहे. त्याअनुषंगाने गत पाच दिवसांपासून गृह विभागाच्या निर्देशांनुसार येथील मध्यवर्ती कारागृहात ९६ कैद्यांना बॉण्डवर सोडण्यात आले आहे.गृहविभागाचे उपसचिव एन.एस. कराड यांनी ८ मे २०२० रोजी अधिसूचना जारी करून कैद्यांना इमर्जन्सी ४५ दिवसांचे पॅरोलवर सुटी देण्याबाबत गाइडलाइन दिली आहे. कोरोना कारागृहात शिरू नये, यासाठी गृह विभागाने उपाययोजना चालविल्या आहेत. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचा आधारानुसार समिती गठित करण्यात आल्या आहेत. ज्या कैद्यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली, ज्यांचे कारागृहात वर्तन चांगले आहे, ज्या गुन्ह्यात आहे, ते सुधारण्याच्या मार्गावर आहेत, अशा बंदीवानांना कारागृहात बॉण्डवर इमर्जन्सी पॅरोल मंजूर केला जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे एकत्र राहत असलेल्या कारागृहातील बंदी बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ८ मे रोजी आदेश धडकताच ९ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रविवारपासून कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गत पाच दिवसांत ९६ कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलेले आहेत. गंभीर गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना याचा लाभ मिळणार नाही, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.चार महिलांसह ९२ पुरूष कैद्यांना लाभसात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या बंदीजनांना इमर्जन्सी पॅरोल मंजूर करण्यात येत आहे. त्यानुसार बंदीजनांची यादी तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. गत पाच दिवसांपासून ९६ कैदी पॅरोलवर सोडले आहेत. यात चार महिला व ९२ पुरूष बंदीजनांचा समावेश असल्याची माहिती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :jailतुरुंग