विंधन विहिरीचे वीज देयक नागरिकांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:00 AM2019-08-25T06:00:00+5:302019-08-25T06:00:33+5:30

सार्वजनिक नळाच्या पाण्यासाठी महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याबाबत नागपूर लेखापरीक्षण कार्यालयाकडून आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये आस्थापना व वीज देयकांवरच्या खर्चावर हा आक्षेप आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे शहरात जलवाहिन्यांचे जाळे आहे.

Electricity payment of piping wells over the citizens | विंधन विहिरीचे वीज देयक नागरिकांच्या माथी

विंधन विहिरीचे वीज देयक नागरिकांच्या माथी

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेला खर्च झेपवेना । नवीन हातपंपामध्येही आता २०० मीटर अंतराची अट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रात भूजलाच्या अमर्याद उपशावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन विंधन विहिरी व हातपंपाबाबत महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नवीन विंधन विहिरीला जुन्या हातपंपापासून २०० मीटरची अट निश्चित करण्यात आली, तर अस्तित्वातील महापालिकेच्या विंधन विहिरीच्या वीजदेयकाचा खर्च नागरिकांच्या माथी मारण्यात आलेला आहे.
महानगरात वैयक्तिक घरगुती पाणीपुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येतो. शहरात पाणीपुरवठ्यासाठी महापालिका व मजीप्रा या शासनाच्या दोन यंत्रणा आहेत. महापालिकेची उद्याने, दवाखाना व इतर सार्वजनिक ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. राज्य शासनाने २५ जून २०१८ रोजी अधिसूचना काढून भूजलाच्या अमर्याद उपशावर नियंत्रण तसेच एकात्मिक पद्धतीने विकास व व्यवस्थापन होण्यासाठी तसेच जमिनीखालील सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे जतन करण्याच्या अनुषंगाने हरकती मागितल्या होत्या. अद्याप ही प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. मात्र, या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत.
सार्वजनिक नळाच्या पाण्यासाठी महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याबाबत नागपूर लेखापरीक्षण कार्यालयाकडून आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये आस्थापना व वीज देयकांवरच्या खर्चावर हा आक्षेप आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे शहरात जलवाहिन्यांचे जाळे आहे. मात्र, ज्या भागात महापालिकाद्वारे मोफत पाणीपुरवठा होत आहे, त्या ठिकाणी नागरिक मजीप्राची जोडणी घेत नाहीत. परिणामी मजीप्राने वीज जोडणीच केलेली नाही. सद्यस्थितीत शहरात ३७७९ हातपंप व ४०६३ विंधन विहीरी आहेत. तरीही नगरसेवकांद्वारे या विषयाची वाढती मागणी आहे. यामुळे वीज देयकांमध्ये वाढ होऊन भूजलात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेत चर्चेला आलेल्या प्रशासकीय विषयान्वये यावर आता बंधन घालण्यात आलेली आहे. मात्र, महापालिकेचे उद्यान, कार्यालये, दवाखाने व स्मशानभूमी किंवा सार्वजनिक वापराच्या जागा येथे अत्यंत आवश्यकता असल्यासएक हातपंप किंवा विद्यृत पंपासह बोअरवेल देण्याबाबत सदस्यांनी सहमती दर्शविली आहे.

महापालिकेच्या ७६४ विंधन विहीरी
महापालिकेच्या महादेवखोरी परिसरात ४४५ व म्हाडा कॉलनी येथे ३१९ विंधन विहिरींद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. यासाठी तीन पंप आॅपरेटर आणि कनिष्ठ लिपिक वीज देयकाची नोंद व देयक सादर करण्यासाठी आहेत. महानगरात ३७७९ हातपंप व विंधन विहिरींवर २८४ वीज पंपाचे कनेक्शन आहे. या देयकापोटी दरमहा पाच लाखांवर खर्च येतो. प्रतिघर ६८ रुपये घेण्याचा महापालिकेचा ठराव आहे. परंतु, नागरिकांकडून देयक भरण्यास टाळाटाळ केली जाते.

देयक भरण्यास महापालिकेचा नकार
महापालिकेने घेतलेल्या ठरावान्वये यापुढे विंधन विहिरींवर महापालिकेद्वारे वीज पंप बसविण्यात येणार नाही. हे देयक आता पाण्याचा वापर करणारे संबंधित नागरिक किंवा सेवाभावी संस्था यांनी भरावे. काही ठिकाणी ग्रुप कनेक्शन करून देयक भरावे. महापालिका यापुढे कोणतेही वीज देयक भरणार नाही, असा ठराव करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी मजीप्राची जलवाहिनी नाही व नैसर्गिक टंचाईचा भाग आहे, अशाच ठिकाणी हातपंप बसविण्यात येणार आहे. नवीन हातपंप मंजूर करावयाचा असल्यास जुन्या हातपंपापासून किमान २०० मीटर अंतर अनिवार्य आहे.

Web Title: Electricity payment of piping wells over the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी