शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचे 'नीट', 'जेईई' मोफत प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:53 IST

मोफत प्रशिक्षण योजनेसाठी प्रवेश परीक्षा : नामवंत खासगी शिक्षण संस्था देणार प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी (जेईई) व वैद्यकीय (नीट) प्रवेश परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन मिळावे म्हणून शासनाने ८ जून २०२३ रोजी विशेष योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत नामांकित खासगी प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने दोन वर्षे मार्गदर्शन दिले जाणार होते. मात्र, प्रत्यक्षात ही योजना केवळ कागदावरच आहे. आदिवासी विकास विभागातील अधिकारी-कर्मचारीसुद्धा या योजनेविषयी अनभिज्ञ असून, ४८० आदिवासी विद्यार्थी योजनेच्या लाभापासून मुकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

आदिवासींच्या चळवळीत अग्रगण्य 'ट्रायबल फोरम' या संघटनेने सरकारला वारंवार पत्रव्यवहार करून नीट, जेईई पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी योजना तयार करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शासनाने ४ कोटी ८० लाख रुपयांची योजना तयार केली होती. मात्र, या योजनेची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. आदिवासी विकास विभागांतर्गत प्रत्येक अपर आयुक्त कार्यालय स्तरावर शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथील कोणत्याही एका शाळेमध्ये एक तुकडी वैद्यकीय व दुसरी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारी करण्यासाठी बनविण्यात येण्याची तरतूद आहे. 

अपर आयुक्त कार्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची निवड

  • प्रत्येक अपर आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर दरवर्षी एक वैद्यकीय व एक अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेश तयारी करवून घेण्यासाठी प्रत्येकी ३० प्रशिक्षणार्थी प्रती तुकडी अशा एकूण ६० विद्यार्थ्यांची निवड अकरावीसाठी केली जाणार होती.
  • प्रथम वर्षासाठी प्रत्येकी ३० प्रशिक्षणार्थी प्रती तुकडी, तर अकरावी व बारावी या दोन्ही वर्गासाठी एकूण ४८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र, अमरावती, नाशिक, नागपूर व ठाणे या चारही एटीसी स्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पत्रव्यवहार नाही.

मोफत प्रशिक्षण योजनेसाठी प्रवेश परीक्षा

  • विद्यार्थ्यांची निवड करताना प्रवेश परीक्षा घेतली जाणार होती. या प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या धर्तीवर तयार करण्यात येणार होती.
  • राज्यात एकाच वेळी प्रवेश परीक्षा घेऊन अंतिम गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश परीक्षेतील प्राप्त गुणास ५० टक्के भारांश आणि दहावी परीक्षेतील प्राप्त गुणास ५० टक्के भारांश देण्यात येणार होता.
  • गुणानुक्रमे अंतिम गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी नाशिक कार्यालयाच्या स्तरावरून प्रसिद्ध केली जाणार होती.

नामवंत खासगी शिक्षण संस्था देणार प्रशिक्षण

  • नामवंत खासगी शिक्षण संस्थेच्या साहाय्याने दोन वर्षांसाठी नीट व जेईई प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम ४८० प्रशिक्षणार्थ्यांसाठी राबविण्यात येणार असून, ४ कोटी ८० लाख रुपयांची योजना आहे.
  • प्रती विद्यार्थी, प्रती वर्ष १ लाख रुपये फी खासगी संस्थेची असून, यामध्ये व्याख्यात्यांचे मानधन, स्टडी मटेरियल, नोट्स, टेस्ट सिरीज, आवश्यक वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके, स्टेशनरी, आदी पुरविणे व इतर अनुषंगिक खर्चाचा तपशील आहे.

"मोफत प्रशिक्षण योजनेसाठी शासनाकडून अद्याप मार्गदर्शन प्राप्त नाही किंबहुना तसे काही आल्यास नामवंत खासगी संस्थेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई, नीटचे प्रशिक्षण दिले जाईल."- जितेंद्र चौधरी, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग अमरावती

टॅग्स :Educationशिक्षणAmravatiअमरावतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना