वडद शिवारात अवैध मुरूम उत्खननावर तहसीलदारांचा पहाटे छापा; JCB सह ट्रक जप्त, माफियांचे धाबे दणाणले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:01 IST2026-01-23T11:00:53+5:302026-01-23T11:01:22+5:30

मौजा वडद परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर अमरावती तहसील कार्यालयाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली.

Early morning raid by Tehsildars on illegal murrum mining in Vadd Shivara; Truck with JCB seized, mafia's fears exposed! | वडद शिवारात अवैध मुरूम उत्खननावर तहसीलदारांचा पहाटे छापा; JCB सह ट्रक जप्त, माफियांचे धाबे दणाणले!

वडद शिवारात अवैध मुरूम उत्खननावर तहसीलदारांचा पहाटे छापा; JCB सह ट्रक जप्त, माफियांचे धाबे दणाणले!

अमरावती: तालुक्यातील मौजा वडद परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर अमरावती तहसील कार्यालयाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे गौण खनिज माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईत अवैध उत्खनन करणारे एक JCB मशीन आणि मुरूम वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे.

पहाटेच्या अंधारात महसूलचा दणका 

गेल्या काही दिवसांपासून वडद परिसरात छुप्या पद्धतीने मुरूम उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळत होती. तहसीलदार विजय लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. जेव्हा संपूर्ण शहर झोपेत होते, तेव्हा पहाटेच्या सुमारास महसूलच्या पथकाने वडद शिवारात धाड टाकली. यावेळी कोणत्याही परवान्याशिवाय सर्रासपणे मुरूम उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.

ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. यामध्ये नायब तहसीलदार टीना चव्हाण, महसूल सहाय्यक रामानंद सरस्वती, मंडळ अधिकारी यशवंत चतुर, अभिजीत देशमुख, गजानन हिवसे, तसेच ग्राम महसूल अधिकारी गोपाळ लांजेवार आणि मेजर वानखडे यांचा समावेश होता. पथकाने घटनास्थळावरून वाहनांची कागदपत्रे आणि वाहतूक परवान्याची विचारणा केली असता, चालकांकडे कोणतेही वैध कागदपत्रे आढळली नाहीत.

लाखोंचा मुद्देमाल जप्त 

महसूल पथकाने घटनास्थळावरून एक JCB मशीन आणि ट्रक जप्त करून तहसील कार्यालयाच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणातील संबंधितांवर आता दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध मुरूम माफियांचे धाबे दणाणले असून परिसरातील बेकायदा उत्खननाला चाप बसण्याची शक्यता आहे.

पर्यावरणाचे नुकसान खपवून घेणार नाही - तहसीलदार 

"अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून शासनाचा महसूलही बुडत आहे. भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील आणि कोणाचीही गय केली जाणार नाही," असा कडक इशारा अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिला आहे.

Web Title : तहसीलदार ने अवैध मुरुम खनन पर छापा मारा, जेसीबी, ट्रक जब्त; माफिया में दहशत!

Web Summary : अमरावती अधिकारियों ने वडद के पास अवैध मुरुम खनन पर छापा मारा, एक जेसीबी और ट्रक जब्त किया। राजस्व अधिकारियों ने एक टिप पर कार्रवाई की, अनाधिकृत खनन पाया। तहसीलदार लोखंडे के नेतृत्व में टीम ने कार्रवाई की, कानूनी कार्रवाई शुरू की। तहसीलदार ने पर्यावरण क्षति के खिलाफ कड़ी कार्रवाई की चेतावनी दी।

Web Title : Tehsildar raids illegal murrum excavation, seizes JCB, truck; mafia shaken!

Web Summary : Amravati authorities raided illegal murrum excavation near Wadad, seizing a JCB and truck. Revenue officials acted on a tip, finding unauthorized mining. A team led by Tehsildar Lokhande conducted the operation, initiating legal action. The Tehsildar warned of intensified action against environmental damage.