शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

अवकाळी पावसाने तूर झोपली, कापूस भिजला, संत्रा गळाला; गार वाऱ्यांनी कमालीचा वाढला गारठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 11:23 IST

आठ घरांची अंशत: पडझड : पहाट धुके, दोन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही

अमरावती : अवकाळी पावसाचा कृषिमालाला मोठा फटका बसला आहे. पावसाने तूर झोपली, कापसाची बोंडे भिजली, तर संत्रा गळाला आहे. केळीसह भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. भाजीपाल्याची आवक मात्र अद्याप सुरळीत असून पावसाचा नक्की काय परिणाम झाला, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने ३० नोव्हेंबरपर्यंत अशीच स्थिती राहील, असे संकेत वर्तविले आहेत. अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कापूस, तूर आणि संत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बहारवर असलेला संत्रा गळल्याने उत्पादक हैराण झाले आहे. काही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसोबत विक्रीचा व्यवहार करून ठेवला होता. मात्र, अवकाळी पावसाने संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नावर विरजण आणले आहे. तर तूर फुलाेरावर असताना पावसाने ती पूर्णत: झोपली आहे. दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक घसरली आहे. भाजीपाला कमी येत असल्याची माहिती भाजीपाला दलाल सलीम खान यांनी दिली.

तुरीचा फुलोर जळणार?

हिवरखेड : संत्रा बगीच्यांची अद्याप तोड झालेली नाही. त्यांचे नुकसान होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. या वातावरणामुळे तुरीचा बहर जळण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत आहे. वालाच्या वेलांवर मोहा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

कापसाला फटका, हरभऱ्यासाठी वरदान

वनोजा बाग : अवकाळी पावसाने फुटलेला कापूस ओला झाला असून, तो माती गळून खराब होण्याची चिन्हे आहेत. परंतु, हे दीर्घ मुदतीचे पीक असल्याने नवीन पात्या, फुले येऊन भरपाई होईल, असा कयास वर्तविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू हरभरा पेरणी केली, त्यांना हा अवकाळी पाऊस नवसंजीवनी ठरणार आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी शेत भिजवून हरभऱ्याची पेरणी केलेली आहे, पावसाने अधिक मुक्काम केल्यास त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे क्षेत्रवाढ होण्याचा व दुबार हरभरा पेरणीचा अंदाज पाहून बाजार समिती तसेच बाहेर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला हरभऱ्याची विक्री बिजवाईच्या दृष्टीने थांबविल्याचे चित्र आहे.

अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला

तिवसा : पावसामुळे भार वाढल्याने तूर पिकाने लोटांगण घेतले आहे. तर रब्बी हंगामातील जेमतेम जमिनीवर डोकावणाऱ्या हरभरा पिकाला अतिरिक्त पाणी झाल्याने हे पीक खुरटले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचाही अवकाळी पावसाने घात केला. आकस्मिक अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर आलेला पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरल्याचे दिसून येत होते. परंतु, सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले, नुकतेच शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला उपसा सिंचन योजनेच्या व अपर वर्धा धरणाच्या पाण्यातून सिंचन केले होते. त्याचवेळी अवकाळी पाऊस पडल्याने हरभरा पिकांवर अरिष्ट ओढवले.

काळी पानपिंपरी झाली पांढरी

अंजनगाव सुर्जी : तोडणीला आलेली आणि काहींनी शेतातच वाळवणीला टाकलेली वनौषधी पानपिंपरी अवकाळी पावसामुळे व दोन दिवसात सूर्यप्रकाश न मिळाल्याने काळ्याची पांढरे झाले. त्यामुळे पिकाचा दर्जा खालावला असून लागलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी सिंचनाचा वापर करून हे पीक जगविले. आता उत्पादन घेण्याची वेळ आली असताना अवकाळी पावसाने घात केला. त्याच वेळी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील केळी, कपाशीसहीत इतरही पिके धोक्यात आली आहेत. १२ महिन्यांचे हे पीक घरी न आल्यास काय होईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

संत्रा उत्पादकांची वाढली चिंता

वरूड : दोन दिवसांपासून जिल्ह्यासह तालुक्यात अवकाळी पावसाने संत्रा उत्पादकांची चिंता वाढवली. वादळी पावसामुळे संत्रा गळती झाली असून भावात घसरण झाली. पावसामुळे रस्ते चिखलमय झाल्याने संत्रा व्यापाऱ्यांचे मालवाहू वाहने जात नसल्याने संत्रा तोड बंद आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. अवकाळी वादळी पावसाने तूर्तास संत्रा उत्पादकांची चिंता वाढविली आहे. गळतीमुळे संत्रा पिकाचे नुकसान झाले असून लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कपाशीलाही फटका बसला असून शेतात असलेला कापूस वेचणीपूर्वी ओल झाला. दुसरीकडे गहू, हरभरा या पिकांना हा अवकाळी पाऊस फायदेशीर असल्याने शेतकऱ्यांमध्ये 'कही खुशी, कही गम' अशी अवस्था झाली आहे.

अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला

तिवसा : पावसामुळे भार वाढल्याने तूर पिकाने लोटांगण घेतले आहे. तर रब्बी हंगामातील जेमतेम जमिनीवर डोकावणारे हरभरा पीक अतिरिक्त पाणी झाल्याने खुरटले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचाही अवकाळी पावसाने घात केला. आकस्मिक अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर आलेला पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरल्याचे दिसून येत होते. परंतु, सलग दुसऱ्या दिवशी पावसाने शेतकऱ्यांचे गणित बिघडले. शेतकऱ्यांनी हरभराला उपसा सिंचन योजनेच्या व अपर वर्धा धरणाच्या पाण्यातून सिंचन केले होते. त्याचवेळी अवकाळी पाऊस पडल्याने हरभरा पिकांवर अरिष्ट ओढवले.

चांदूर रेल्वे तालुक्यात पिकांचे नुकसान

चांदूर रेल्वे : तालुक्यात दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस असून, कापूस, तूर व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शेतकरी वर्गात चर्चा आहे. महसूल विभागाने तत्काळ सर्व्हे करावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत शिरभाते यांनी केली. एकीकडे सोयाबीनचा पिकाचे नुकसान अत्यल्प पीक झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यातच कापूस आणि तूर पिकावर कर्जाची परतफेड होईल, अशी आशा होती. परंतु पावसाने अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आशा मावळली. याबाबत शासनाने दखल घ्यावी व शेतकऱ्यांना भेट द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रCropपीकAmravatiअमरावती