शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात वरुणराजाचा दुष्काळ! १२९ गावांची तहान टँकर-विड्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:17 IST

टंचाई कायम : १२७ विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण, २० टँकरवर मदार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत मे महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार निर्माण केला होता. त्यानंतर आता निम्मा जून महिनाही संपत आला आहे. असे असताना वरुणराजा मात्र अद्यापही बरसला नाही. परिणामी, जिल्ह्यातील मेळघाटासह गैर आदिवासी भागातील १० हजारांवर नागरिकांना २० टँकर व १२७ विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करून १२९ गावांची तहान भागविली जात आहे.

पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, अद्याप जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी, ग्रामीण भागात टँकर आणि विहीर अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये जून महिन्यापर्यंतचे नियोजन केले आहे. मात्र, दरवर्षी जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. पाणीटंचाई निवारणाचे काम वरुणराजा करतो. यंदा जिल्ह्यात उन्हाचा तडाखाही चांगला वाढला आहे. अद्यापपर्यंतही जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. पाऊस लवकर पडला तर टँकर, बोअरवेल अन् विहिरी अधिग्रहण पाणीपुरवठ्यातून नागरिकांचीही सुटका होणार आहे. पाऊस पडत असला तरी कुठे पडतो, तर कुठे काहीच नाही. त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती जोरदार पाऊस पडेपर्यंत सुधारणार नाही.

चिखलदऱ्यातील १० गावांत टँकरने पाणीमेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी, खडीमल, मोथा, लवादा, शहापूर, तारुबांदा, गौलखेडा बाजार, मेहरीअम, बहादरपूर, धरमडोह, गवळीढाणा, आलाडोह, खिरपाणी आदी १० गावांत २० टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

४३ बोअरवेल, ८४ विहिरींचे अधिग्रहणपाणीटंचाई निवारणार्थ प्रश्न सोडविण्यासाठी १०९ गावांत विहिरी, ४३ बोअरवेल आणि ८४ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणांहून वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. यामधून पाणीटंचाईची समस्या निवारण केले जात आहे.

"पाणीटंचाई आराखड्यातील नियोजनानुसार ज्या गावात सध्याही पाणीटंचाईची समस्या आहे, अशा दहा गावांत टँकरने तर १०९ गावांत विहीर व बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे."- सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Melghatमेळघाटwater scarcityपाणी टंचाई