शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करू नका : बावनकुळेंची राणा, बोंडेंना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:43 IST

Amravati : परतवाडा येथील खळबळजनक 'व्हिडीओ कांड' प्रकरणावरून सध्या अमरावती जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले असतानाच, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परतवाडा येथील खळबळजनक 'व्हिडीओ कांड' प्रकरणावरून सध्या अमरावती जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले असतानाच, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. पुरावे असतील तर पोलिसांना द्या; पण मीडियासमोर बोलून समाजात तेढ निर्माण करू नका, अशा शब्दांत बावनकुळे यांनी माजी खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान या तिघांचीही जाहीर कानटोचणी केली. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर रान उठवणारे भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यात कुठेही दिसले नाहीत, ही चर्चेची बाब ठरली.

परतवाडा प्रकरणात १८ व्हिडीओ आणि ८ पीडिता निष्पन्न झाले असताना, खा. अनिल बोंडे यांनी १८० मुली आणि ३५० व्हिडीओंचा दावा केला होता. बावनकुळे यांनी या दाव्यातील हवाच काढून टाकली. जोपर्यंत पोलिसांकडून अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत लोकप्रतिनिधींनी आकड्यांची फेकाफेकी करू नये. यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होते आणि मुख्य म्हणजे पीडित मुली पुढे येण्यास घाबरतात, असे बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले. पालकमंत्र्यांनी शनिवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन तपासाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. प्रवीण तायडेदेखील उपस्थित होते. 

काय म्हणाले बावनकुळे?

राणा, बोंडे किंवा प्यारे खान, कुणाकडेही पुरावे असतील तर त्यांनी ते तत्काळ एसआयटीकडे सोपवावेत. माध्यमांनी सोशल मीडिया किंवा नेत्यांची विधाने नव्हे, तर पोलिसांनी दिलेली माहितीच अधिकृत मानावी, असे आवाहनदेखील बावनकुळे यांनी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच आयींकडून याप्रकरणाचा आढावा घेतला असून, आरोपी देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याला शोधून काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.'कोणत्याही लोकप्रतिनिधीने पोलिसांचा किंवा एसआयटीचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न करू नये. माध्यमांनीही संवेदनशीलतेने वार्तांकन करावे. हा तपास योग्य दिशेने सुरू असून, ग्रामीण पोलिस कौतुकास पात्र आहेत. त्यांनी सुमोटो कारवाई केली, असेही बावनकुळे म्हणाले.

बयाण आणि फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

नागपूरहून एक १५ वर्षीय पीडिता बयान देण्यासाठी आली असून, पोलिस अत्यंत सतर्कतेने तपास करत आहेत. अमरावती ग्रामीण पोलिसांनी व्हायरल व्हिडीओ रोखून परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल बावनकुळे यांनी एसपी विशाल आनंद यांचे कौतुक केले.आता सर्वांचे लक्ष फॉरेन्सिक अहवालाकडे लागले असून, त्यानंतरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid inciting discord with false statements: Bawankule warns Rana, Bonde.

Web Summary : Minister Bawankule cautioned Rana, Bonde, and Khan about making unsubstantiated claims regarding the Partwada incident, emphasizing the need to avoid societal division. He urged reliance on official police information and highlighted ongoing investigation progress, warning against obstructing the probe.
टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेAmravatiअमरावती