शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वाहन न दाखवताच घ्या ‘पीयूसी’

By admin | Updated: January 22, 2015 00:16 IST

शहरातील विविध मार्गांवरून दररोज हजारोे वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणरहित असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात..

लोकमत चमू अमरावतीशहरातील विविध मार्गांवरून दररोज हजारोे वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणरहित असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या ‘पीयूसी’ केंद्रांकडून देण्यात येते. मात्र, ‘पीयूसी’देताना पाळावयाचे निकष धाब्यावर बसवून ‘वाहन क्रमांक सांगा आणि पीयूसी घेऊन जा’ असा प्रकार सर्रास सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान उघड झाले. प्रादेशिक परिवहन विभागाचा या पीयूसी केंद्रांवर कोणताच अंकुश नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी शहरातील अनेक भंगारावस्थेत पडून असलेल्या वाहनांची ‘पीयूसी’ या केंद्रांकडून केवळ वाहनक्रमांक सांगून अगदी सहजरीत्या मिळविली. शहरातील वाढत्या प्रदूषणाची कारणमीमांसा या स्टिंग आॅपरेशनंतर अगदी सहजरीत्या करता येईल. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यात फिरते आणि स्थायी स्वरूपाचे एकूण १७ ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र’ अधिकृतरीत्या सुरू आहेत. यामध्ये १२ केंद्र शहरात तर ५ केंद्र ग्रामीण भागात कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश केंद्रांवर वाहने न तपासताच पीयूसी देण्यात येते. या प्रकारामुळेच अमरावती शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. वाहनांची अवस्था व ते प्रदूषणरहित आहे काय, याची शहानिशा न करताच ‘पीयूसी’ दिली जात असल्याने अमरावतीकरांच्या आरोग्याला धोका उद्भवत आहे.स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयवेळ :१.३५४जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धूळ खात पडलेल्या कार एम.एच.२७-ए.ए.-५ वाहनाचे छायाचित्र आमच्या छायाचित्रकाराने टिपले. त्यानंतर काही वेळातच आरटीओ कार्यालयासमोर असणाऱ्या एका पीयूसी केंद्रावर वाहन न आणताच त्याच वाहनाची ५० रुपये देऊन पीयूसी काढली. ही संशयास्पद वाटल्याने केंद्र संचालकाने ‘लोकमत’ प्रतिनिधीकडून ती पीयूसी काढून घेतली. पैसे परत केले. यावरून भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेस्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय दि.-१९ जानेवारीवेळ : दुपारी १२.१५ वाजता४जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कार एम.एच.-२७-ए.ए.-११११ या वाहनाचे हे छायाचित्र. शहरातील दुसऱ्या पीयूसी केंंद्रावर जाऊन वाहन न दाखविता या वाहनाची पीयूसी मिळविली. त्यावेळी केंद्रावरील कर्मचाऱ्याने वाहन कुठे आहे, असा प्रश्न केला. पण नंतर लगेच प्रमाणपत्र दिले. स्थळ : हिवताप अधिकारी कार्यालयवेळ : दुपारी २.३३४जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय परिसरात भंगार अवस्थेत पडलेली जीप एम.एच.२७-एच.झेड.-५४ हा या वाहनाचा क्रमांक. ‘लोकमत’ने या वाहनाला कॅमेराबद्ध करून तेथीलच एका पीयूसी केंद्रातून ही वाहने ‘प्रदूषणरहित’ असल्याचे प्रमाणपत्रदेखील मिळविले. या केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी ना वाहन तपासण्याची तसदी घेतली, ना कुठली शहानिशा केली. चक्क ५० रुपये घेऊन पीयूसी हातात दिली, हे वास्तव आहे.