शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्यायलाच पाणी नाही, तेथे फिल्टर करणार काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:23 IST

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर १० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असताना त्यावर साधा ब्र काढायला पांढरपेशांना वेळ नाही.

ठळक मुद्देतहानलेले नंदनवन : जलशुद्धीकरणाला ३.५० कोटी

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर १० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असताना त्यावर साधा ब्र काढायला पांढरपेशांना वेळ नाही. दुसरीकडे जलशुद्धीकरणासाठी शासनाने तीन कोटी ६० लक्ष रुपये मंजूर केले. मात्र पाणीच नाही तेथे कुणाला फिल्टर करायचे म्हणायची वेळ आली आहे.चिखलदरा शहराला अनेक वर्षांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सतत लावून धरले. त्यावर ३ महिन्यांपूर्वी ३ कोटी ५९ लक्ष रुपये खर्चून जलशुद्धीकरण, साडेपाच किलोमीटर लांबीची गावातील जुनी पाईपलाईन काढून ९० ते ११० मि.मी. व्यासाची पाईपलाईन आदी कामे केली जाणार आहेत. कालापाणी तलावावर जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जाणार आहे. मात्र शहराला पाणीपुरवठा करणारे सक्कर तलाव आणि काला पाणी या दोन्ही साठवण तलावांची अवस्था पालथ्या घागरीवर पाणी टाकण्यासारखी आहे. पावसाच्या पाण्यामुळे तलाव एकीकडे भरत असताना दुसरीकडे दोन्ही तलावांना असलेले लिकेजमुळे ते रिकामे होतात. परिणामी जलशुद्धीकरण केंद्र तयार होत असल्याची आनंददायी बाब असताना पाणीच नाही. तेथे कुणाला फिल्टर करणार, असा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी चिखलदरा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने त्यावर लक्ष देण्याची गरज आहे.विस्तारीकरणाची गरजराज्यभर कोट्यवधी रुपयांच्या नितून जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहे. चिखलदºयातील सक्कर तलाव आणि कालापाणी तलावाच्या पाणी गळतीसोबत विस्तारीकरणाची तत्काळ गरज आहे. पावसाळ्यातच या दोन्ही तलावाचे विस्तारीकरण जलयुक्त शिवारातून झाल्यास पाणी साठ्यात वाढत होणार आहे. मात्र हे करायला स्थानिय प्रशासन, नगरपरिषद, लोकप्रतिनिधी आदींचे वेळकाढू धोरण, विदर्भाच्या नंदनवनाची पाणी समस्या दूर करणार का, हे आज तरी अनुत्तरित आहे.जलशुद्धीकरणासाठी ३ कोटी ५९ लक्ष रुपयांचा निधी आला. त्यात पाईपलाईन आदी कामे असून निविदा अंतिम टप्प्यात आहे. कालापाणी तलावावर केंद्र होणार आहे.- शरद सिनकर,उपअभियंता, मजीप्रा, अंजनगाव