अमरावतीत डीएनए प्रयोगशाळा; गुन्ह्याच्या तपासाला येणार वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:47 PM2019-07-17T12:47:05+5:302019-07-17T12:47:53+5:30

रक्तचाचणीत महत्त्वाचा घटक असलेल्या डीएनए चाचणीचा अहवाल आता अमरावती स्थित न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतून मिळविता येणार आहे. यापूर्वी डीएनएचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात येत होते.

DNA laboratory in Amravati; There will be speed to check crime | अमरावतीत डीएनए प्रयोगशाळा; गुन्ह्याच्या तपासाला येणार वेग

अमरावतीत डीएनए प्रयोगशाळा; गुन्ह्याच्या तपासाला येणार वेग

Next
ठळक मुद्देवेळेची बचत

चेतन घोगरे/
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रक्तचाचणीत महत्त्वाचा घटक असलेल्या डीएनए चाचणीचा अहवाल आता अमरावती स्थित न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतून मिळविता येणार आहे. यापूर्वी डीएनएचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात येत होते. चाचणी अहवालासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागत होता. अमरावतीला डीएनए चाचणीसाठी सुसज्ज प्रयोगशाळा झाल्याने वेळेची बचत होणार आहे.
अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांचे मुख्यालय असलेल्या अमरावती शहरात डीएनए चाचणीची न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नव्हती. त्यामुळे आवश्यक नमुने तपासायला नागपूरला पाठविण्यात येत होते. त्यासाठी सुमारे एक वर्षे वा त्यापेक्षा अधिकचा कालावधी लागत होता. त्याअनुषंगाने अमरावतीला या चाचणीची सुविधा निर्माण करण्यात आली. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या मागील परिसरात असलेल्या सुसज्ज इमारतीत डीएनए विभागास १० जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षकांना निर्देश
अमरावती परिक्षेत्रातील पाचही पोलीस अधिक्षकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्ह्याच्या संदर्भातील डीएनए चाचणीची प्रकरणे वा मुद्देमाल अमरावतीच्या प्रादेशिक न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयेगशाळेला पाठविण्यात यावी. त्याबाबत अधिनस्थ ठाणेदारांना सूचना द्याव्यात, असे निर्देश न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे प्रभारी संचालक कृ.वि. कुळकर्णी यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत.

डीएनए चाचणीची सुविधा अमरावती शहरात झाल्याने वेळेची बचत होईल. प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील. न्याय यंत्रणा व पोलीस यंत्रणेकडून डीएनए चाचणीचे प्रकरण न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत येत असतात.
- मकरंद रानडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र
 

Web Title: DNA laboratory in Amravati; There will be speed to check crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस