शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानात निविदेचा खोडा

By admin | Updated: March 16, 2015 00:18 IST

महाराष्ट्र दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानात निविदा प्रक्रियेचा खोडा येत आहे.

अमरावती : महाराष्ट्र दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानात निविदा प्रक्रियेचा खोडा येत आहे. अवघे पाच दिवस उणेपुरे असताना अभियंते, कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने निविदा प्रक्रिया कशी पूर्ण करावी, या विवंचनेत अधिकारीवर्ग आहे. मात्र, काहीही करा हे अभियान यशस्वी झालेच पाहिजे अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांची असल्याने संबंधित विभाग हतबल झाला आहे.येथील शासकीय विश्राम भवनात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षस्थानी शनिवारी पार पडलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ही बाब स्पष्ट झाली. जलयुक्त शिवार अभियानात नैसर्गिकरीत्या पडणारे पाणी त्याच गावात साठवून ठेवण्यासाठी नाले खोलीकरण, सिमेंट बंधारे बांधण्याचे प्रस्तावित आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांत २८५ गावांचा या योजनेत समावेश आहे. २१० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेतील कामे ही जेसीबी अथवा पोकलँड मशीनद्वारे करण्याचे धोरण आहे. शासन निर्णयानुसार ई निविदा प्रक्रिया राबवूनच या योजनतील कामे सोपवावी लागणार आहे. मात्र कृषी विभागात पारंपरिक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी असल्याने जलयुक्त शिवार अभियानाच्या निविदा प्रक्रिया या जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन, भूजल सर्वेक्षण आणि जलसंधारण विभागामार्फत राबविले जाणार आहे. मोठा गाजावाजा करुन या योजनेला प्रारंभ करण्यात आला असला तरी सर्वेक्षणानंतर गावे निश्चित करणे ही पाच दिवसांत पूर्ण न होणारी प्रक्रिया आहे. एकिकडे मनुष्यबळाचा अभाव असून शासन स्तरावरुन ही योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबावतंत्र येत आहे. ई निविदा प्रक्रिया राबविताना अभियंते, कर्मचाऱ्यांची वानवा ही बाब असताना २० मार्च पूर्वी जलयुक्त शिवार अभियानाची निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरु करण्याची सक्ती असल्याने अधिकारी ‘कोमात’ जात आहे. सर्वेक्षण, दरकरार, निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांना कामे सोपविणे हे पाच दिवसात शक्य होणार नाही, अ‍ेस खासगीत काही अधिकारी बोलू लागले आहेत. मनुष्यबळ ही बाब सर्वश्रूत असून पाच दिवसात योजनेची कामे सुरु करणे अशक्य असल्याची भावना अधिकाऱ्यांची आहे.