जिल्हा युवक काँग्रेसचे ‘पकोडे बेचो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST2021-09-18T05:00:00+5:302021-09-18T05:00:52+5:30
जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. केंद्रातील भाजप सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार दिन साजरा करून पकोडे बेचो आंदोलन करण्यात आले.

जिल्हा युवक काँग्रेसचे ‘पकोडे बेचो’ आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी बेरोजगारी दिन साजरा केला. केंद्र सरकारच्या रोजगारविषयक धोरणांचा निषेध पकोडे बेचो आंदोलनाने करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. केंद्रातील भाजप सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार दिन साजरा करून पकोडे बेचो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पंकज मोरे, प्रदेश युवक काँग्रेस महासचिव राहुल येवले व सागर देशमुख, सचिव समीर जवंजाळ, नीलेश गुहे, यशवंत काळे, योगेश बुंदेले, रोहित देशमुख व सागर यादव, संकेत कुलट, अक्षय बांते, वैभव देशमुख, आशिष कांबळे, गुड्डू हमीद, विक्रम राऊत, तन्मय मोहोड, मोहित भेंडे, केदार भेंडे, प्रवीण सवाई, आकाश मेहरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.