शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकास अटक, अनेक जण रडारवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 20:40 IST

स्वप्निल पळसकर (४०, रा. वरूड) असे अटक केलेल्या जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकाचे नाव आहे.

अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) मधील कोट्यवधीच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून जबानी आटोपल्यावर आरोपींचे अटकसत्र सुरू झाले आहे. त्यानुसार बुधवारी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकास अटक करण्यात आली. अनेक बडे मासेही पोलिसांच्या रडारवर आहेत. 

स्वप्निल पळसकर (४०, रा. वरूड) असे अटक केलेल्या जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकाचे नाव आहे. गणेश चौधरी याने १ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१७ या कालावधीत नियमांचे उल्लंघन करून ६ कोटी १२ लाख ३९ हजार ९३५ रुपयांचा गैरव्यवहार केला, अशी तक्रार लेखाधिकारी दिगंबर नेमाडे यांनी ३ जुलै रोजी गाडगेनगर ठाण्यात दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी गणेश चौधरीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. या काळात गणेश चौधरीने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने सदर अर्ज फेटाळून लावला.

उच्च न्यायालयाने अर्जावर सुनावणीदरम्यान गणेश चौधरीला ८ ते १० आॅगस्ट दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत चौकशीसाठी अमरावती पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गणेश चौधरीने आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. पोलिसांच्या तपासात गैरव्यवहार प्रकरणात अनेकांची नावे पुढे आली. त्याआधारे पोलिसांनी या प्रकरणात जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक स्वप्निल पळसकर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जामिनावर शुक्रवारी निर्णयतत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरीच्या जामीन अर्जावर १६ आॅगस्ट रोजी निर्णय होणार आहे. त्याच्या जामिनावर निर्णय झाल्यावर पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :Arrestअटक