शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

तहानलेल्या वाघांची पाण्यासाठी वणवण, वनविभागाकडून उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 04:40 IST

वाढत्या तापमानामुळे चैत्रातच वैशाख वणव्याच्या झळा सोसणाऱ्या विदर्भात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगलातील पाणवठे आटू लागल्याने वाघांसह वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

- गणेश वासनिकअमरावती  - वाढत्या तापमानामुळे चैत्रातच वैशाख वणव्याच्या झळा सोसणाऱ्या विदर्भात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगलातील पाणवठे आटू लागल्याने वाघांसह वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पहिल्यांदाच मार्चमध्ये अशी परिस्थिती उद्भवल्याने वाघांची तहान भागविणे वनविभागासाठी जिकरीचे झाले आहे.राज्यात सहापैकी ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. तेथे आजमितीला १७० ते १७५ वाघ आहेत. यंदा उन्हाळा तीव्र असेल, अशी शक्यता वेधशाळेने व्यक्त केल्यानंतर व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पुरेसे पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे काम सुरू आहे. जंगलात साधारणपणे १० कि.मी. अंतरावर कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत.काही पाणवठ्यांवर सौरऊर्जेवर स्वयंचलित हातपंपाद्वारा पाणीपुरवठा केला जाणार आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मेळघाट, ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पात प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. उन्हाची धग वाढत असताना काही जंगलांमध्ये वणवा लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे हे दोन महिने वन्यजिवांचे संरक्षण करताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.तपासणीसाठी ‘लिटमस’ पेपरकृत्रिम पाणवठ्यात विषप्रयोग करून वन्यजिवांची शिकार करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणवठ्यातील पाणी १२ तासांपेक्षा अधिक काळ साठवून राहता कामा नये. पाणवठ्यात कोणी विषप्रयोग केला असेल, तर ते तपासून पाहण्यासाठी वनकर्मचाºयांना तांबडा लिटमस पेपरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणवठ्यात विष टाकले असेल, तर लिटमस पेपरचा रंग लाल होतो.वन्यजिवांची पाण्यासाठी भटकंती होणार नाही, यादृष्टीने जंगलांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेतव्याघ्र प्रकल्प अधिकाºयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. यासोबतच शिकाºयांवरही आम्ही लक्ष ठेऊन आहे.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर 

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवAmravatiअमरावती