शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जाधव घराण्यातील वंशजही परक्रामीच!  खरा इतिहास पुढे आलाच नाही - शिवाजीराजे जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 21:30 IST

मांसाहेब जिजाऊंचे वडील लखुजी जाधव यांच्यासह त्यांची तीन मुले आणि नातवाची हत्या निजामाने केली. लखुजी जाधवांनंतरच्या पिढीतील वंशजही पराक्रमीच होते. तथापि, इतिहासकारांनी पराक्रमाचा हा इतिहास पुढे येऊ दिला नाही, अशी खंत या घराण्याचे १३ वे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी येथे व्यक्त केली. 

- संदीप मानकर

अमरावती : मांसाहेब जिजाऊंचे वडील लखुजी जाधव यांच्यासह त्यांची तीन मुले आणि नातवाची हत्या निजामाने केली. लखुजी जाधवांनंतरच्या पिढीतील वंशजही पराक्रमीच होते. तथापि, इतिहासकारांनी पराक्रमाचा हा इतिहास पुढे येऊ दिला नाही, अशी खंत या घराण्याचे १३ वे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी येथे व्यक्त केली. राजमाता जिजाऊ यांच्या जाधव कुटुंबातील सदस्यांची हत्या झाली त्यावेळी मांसाहेबांनी त्यांचे भाचे संताजी ऊर्फ सुर्जनसिंह यांना सोबत नेले होते. त्याकाळी कुठलाही हत्ती चवताळला, तर त्याला तलवारीने काबूत करण्याचे हे पराक्रमी काम संताजी यांचा मुलगा शंभूसिंह करीत होते. शंभूसिंहांनी साडेतीनशे मावळे सोबत घेऊन बाजीप्रभू देशपांडेंसोबत पावनखिंडीत बलिदान दिले. पण, त्यांचे नाव इतिहासकार विसरले. छत्रपती शिवाजी राजे, संभाजी राजे यांच्यानंतर मराठ्यांचे नेतृत्व संपल्याचा समज मुघलांचा झाला होता. परंतु, सिंदखेडराजा येथील सेनापती धनाजीराव जाधव व संताजी घोरपडे यांच्या अफाट पराक्रमामुळे औरंगजेबाच्या सैन्यावर दहशत निर्माण झाली होती. या जोडीने महाराष्ट्रात मुघलांना आठ वर्षे झुंजवत ठेवले. त्यांनी यावेळी पिलाजी जाधवांच्या पराक्रमाचाही उल्लेख केला. सिंदखेडराजाबद्दल आम्ही ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन सांगतो, त्यावेळी हे खरे आहे काय, असे विचारले जाते. इतिहासकारांच्या कृत्यामुळे इतकी वाईट स्थिती आज आपल्यावर आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव यांनी त्याकाळी १४०० एकर जमिनीत तलाव बांधून शेतकºयांसाठी सिंचनाची व्यवस्था केली. आजही तो तलाव मोेठ्या अभिमानाने उभा आहे, अी माहिती त्यांनी दिली. रामसिंग भट नावाचे लखुजी जाधवांचे भट होते. त्यांनी लिहून ठेवलेले  पुरावे उपलब्ध आहेत. ज्यावेळी राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, त्यावेळी हत्तीवरून लोेकांना साखर वाटण्यात आली होती. आजच्या प्रगत युगात आम्ही स्त्रीभू्रणहत्या करतो. त्या काळात मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात होता. जिजाऊ नसत्या तर शिवाजीराजे असते काय, असा सवाल करून खरा इतिहास नव्या पिढीसमोर यायला हवा. तरुणांनी पुढे येऊन इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Amravatiअमरावती