शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पदवी, पदव्युत्तर प्रवेशाला मिळणार मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, संत  गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षांचे नियोजन केले. तसेच ३ नोव्हे्ंबरपासून निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. मात्र, निकाल जाहीर करताना अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका विद्यापीठात पोहचल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने पदवी, पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला.

ठळक मुद्देविद्वत्त परिषदेच्या बैठकीकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका नाही. अशातच प्रवेशाची मुदत संपत असल्याने पुढील अभ्यासक्रमात प्रवेश कसा करावा, ही चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना आहे. मात्र, विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी तब्बल १५ ते २० दिवसांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर शुक्रवारी आयोजित विद्धत परिषदेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, संत  गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षांचे नियोजन केले. तसेच ३ नोव्हे्ंबरपासून निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. मात्र, निकाल जाहीर करताना अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका विद्यापीठात पोहचल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने पदवी, पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला. पदवीसाठी ३० नोव्हेंबर, तर पदव्युत्तर प्रवेशासाठी ८ डिसेंबर अशी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, बीएस्सी सत्र ६ चे सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांपैकी ८ हजार विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिका मिळालेली नाही. या विद्यार्थ्यांनी कधी प्रवेश घ्यावा, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कोविड १९ च्या स्थितीमुळे अंतिम वर्षाचा निकाल उशीरा घोषित झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका घेण्यासाठी किमान आठ दिवसाचा वेळ मिळणे अपेक्षित आहे. मात्र अशातच विद्यापीठ पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख ८ डिसेंबर निश्चित करण्यात आली. सद्या प्रलंबित निकालामुळे विद्यार्थ्याना गुणपत्रिका  मिळाल्या नाही. मात्र पदवी-पदव्युत्तरचे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळणार असल्यामुळे मोठा दिलासा मिळण्याचे संकेत मानले जात आहे.

चौथ्या दिवशीही ‘विथहेल्ड’ची गर्दीअमरावती विद्यापीठ अंतर्गत अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यातून ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी गुरूवारी चौथ्या दिवशीही विद्यार्थ्यांची गर्दी कायम होती. एका खिडकीहून दुसऱ्या खिडकींवर विद्यार्थ्यांच्या येरझारा दिसून आल्यात.  

विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांत पदवी, पदव्युत्तर प्रवेशापासून कुणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही. प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळेल, अशी तयारी विद्यापीठाने चालविली आहे. शुक्रवारी विद्धत परिषदेत याविषयी निर्णय होईल. - राजेश जयपूरकर, प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :universityविद्यापीठEducationशिक्षण