शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

मानधनातून कर्ज कपात

By admin | Updated: May 19, 2014 23:01 IST

अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे एक महिन्याच्या मानधनातून परस्पर कर्ज कपात केल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस आर्थिक संकटात सापडल्या आहेत. शहरी बाल विकास प्रकल्प

अमरावती : अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे एक महिन्याच्या मानधनातून परस्पर कर्ज कपात केल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस आर्थिक संकटात सापडल्या आहेत. शहरी बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत ३१५ सेविका व मदतनिसांचे मानधन संबंधित पतसंस्थेने कपात केले आहे.

जिल्ह्यात हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस आपले कार्य जबाबदारीने पार पाडत आहेत. त्याकरिता प्रशासनाकडून अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी ४ हजार ५0 तर मदतनिसांना दोन हजार रुपये मानधन देण्यात येते. हे मानधन बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत त्या-त्या कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक सहकारी पतसंस्थेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे १५७ अंगणवाडी सेविका व १५८ मदतनिसांनी कर्जाची परतफेड केली नाही.

परिणामी अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा ३१५ जणांचे ७६ हजार ९१४ रुपयांचे मानधन कपात करण्यात आले आहे. दर महिन्याला देण्यात येणार्‍या मानधनातून एकदम कर्जाची रक्कम कपात केल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस आर्थिक सकंटात सापडल्या आहेत. यामध्ये काही अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी कर्जाची परतफेड केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र पतसंस्थेने थकबाकी काढून त्यांच्याही मानधनात कपात केली आहे. त्यामुळे पतसंस्था आपला मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी केला आहे.

तुटपुंजा मानधनावर अंगणवाडी कर्मचारी सेवा देत आहेत. चिमुकल्यांच्या संगोपनासह त्यांच्या व त्यांच्या मातांच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर सोपविली आहे. यासह राष्ट्रीय कार्यात त्यांची सातत्याने मदत घेतली जाते. महिन्याकाठी त्यांना मिळणार्‍या मानधनाच्या भरोशावर त्या महिन्याभराच्या खर्चाचा हिशेब तयार करतात. (प्रतिनिधी)