शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत ‘खुर्ची’चा वाद

By admin | Updated: September 11, 2014 23:09 IST

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि फ्रंटमध्ये सुरु असलेला गटनेतेपदाचा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत गटनेतेपदी

केबीनवर दावा : मार्डीकर, काळे यांचे खुर्चीसाठी प्रशासनाला पत्रअमरावती : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि फ्रंटमध्ये सुरु असलेला गटनेतेपदाचा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत गटनेतेपदी अविनाश मार्डीकर की, सुनील काळे? हा वाद आयुक्तांच्या दालनात पोहोचला आहे. दोन्ही गटनेत्यांनी ‘खुर्ची‘वर परस्पर दावे केल्याने प्रशासनाने याविषयी विधिज्ज्ञांकडून सल्ला मागविला आहे. गुरुवारी मार्डीकर व काळे यांच्यात खुर्चीसाठी जोरदार रस्सीखेच झाल्याची माहिती आहे.विभागीय आयुक्त, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट यांच्यातील गटनेतेपदाचा प्रवास सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विभागीय आयुक्तांचा आदेश रद्द करुन अविनाश मार्डीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतेपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सुनील काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी न करता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशावर स्थगनादेश दिला. त्यानंतरही राष्ट्रवादीचे गटनेता अविनाश मार्डीकर की सुनील काळे हा वाद अद्यापही संपला नाही. दोन्ही गटांनी गटनेतेपदाचा दावा कायम ठेवला आहे. त्यानंतर महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट यांच्यात हातमिळवणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटला महापौर तर काँग्रेसला उमपहापौर पद मिळाले. काँग्रेसने दगाबाजी केल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसने केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगनादेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हाच महापालिकेत खरा पक्ष असल्याचा दावा सुनील काळे यांनी केला. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुनील काळे यांनी अविनाश मार्डीकर यांच्या ताब्यात असलेले केबीन आणि खुर्चीवर दावा केला. त्यानंतर मार्डीकर आणि काळे यांच्यात ‘खुर्ची’ ताब्यात घेण्यासाठी स्पर्धा लागली. सुनील काळे यांनी आयुक्तांना आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगनादेशाचा आधार घेत सांगितले. दुसरीकडे अविनाश मार्डीकर यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने केवळ स्थगनादेश दिला. गटनेता कोण? हा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे आपणच गटनेतेपदी कायम आहोत, असा युक्तिवाद केला. या अनुषंगाने महापालिका आयुक्तांना पत्रसुद्धा त्यांनी दिले आहे. गटनेतेपदाच्या खुर्चीवरुन रंगलेला वाद टोकाला जाण्याची शक्यता बळावली असताना आयुक्त अरुण डोंगरे यांनी सर्वोच्च न्यायालयात महापालिकेच्या पॅनेलवर असलेल्या विधीज्ज्ञांकडून याविषयी मार्गदर्शन मागविले आहे. हे मार्गदर्शन येताच गटनेतेपदाचा वाद संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.