शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

धरणे हाऊसफुल्ल, अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

अमरावती तालुक्यातील बडनेरा मंडळात १११.५ मिमी व शिराळा मंडळात ६२.५ मिमी पाऊस कोसळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा मंडळात ११६ मिमी व धानोरा मंडळात ९८.८ मिमी पाऊस कोसळला. परिणामी माहुली चोर येथे पुलावरून पाणी गेले. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला मंडळात ९३.५ मिमी पाऊस झाला. तिवसा तालुक्यातील मोझरी शिवारात ७२.३ मिमी पावसाची नोंद झाली, धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी मंडळात ६६.५ मिमी पावसाची नोंद झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून विजांच्या कडकडाटाने सुरू झालेल्या पावसाच्या पाण्याने सात मंडळांमध्ये अतिवृष्टी आणली. धामणगाव, चांदूर रेल्वे, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, तिवसा या पाच तालुक्यांमध्ये पाऊस कोसळत आहे.अमरावती तालुक्यातील बडनेरा मंडळात १११.५ मिमी व शिराळा मंडळात ६२.५ मिमी पाऊस कोसळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा मंडळात ११६ मिमी व धानोरा मंडळात ९८.८ मिमी पाऊस कोसळला. परिणामी माहुली चोर येथे पुलावरून पाणी गेले. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला मंडळात ९३.५ मिमी पाऊस झाला. तिवसा तालुक्यातील मोझरी शिवारात ७२.३ मिमी पावसाची नोंद झाली, धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी मंडळात ६६.५ मिमी पावसाची नोंद झाली. ३२५ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले.

एक जण गेला वाहून अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी लखाड-खिराळा मार्गावरील पुलावरून पाय घसरल्याने वाहून गेला. 

तालुकानिहाय बाधित गावांची संख्यातिवसा तालुक्यात २२, भातकुली २३, चांदूर रेल्वे ५, धामणगाव रेल्वे २७, नांदगाव खंडेश्वर ५, मोर्शी ४, वरूड ७, अंजनगाव सुर्जी ८, अचलपूर २, धारणी १, चिखलदरा ५ अशी एकूण १०९ गावे २४ तासांच्या मुसळधार पावसाने बाधित झाली.

१७ जणांचा रेस्क्यू तिवसा तालुक्यातील भिवापूर तलावात अडकलेल्या सहा जणांचा गुरुवारी रेस्क्यू करण्यात आला. एकपाळा येथील त्रिवेणी संगमावर अडकलेल्या तिघांना पुरातून बाहेर काढण्यात आले. रायगड प्रकल्पाच्या पाण्यामुळे कोलाड नदीच्या पुरातून पळसखेड, दिघी येथील आठ जणांना बाहेर काढले. 

२७८ घरांचे  नुकसान तिवसा तालुक्यातील ८७, भातकुली ७६, चांदूर रेल्वे १४, धामणगाव रेल्वे १७, नांदगाव खंडेश्वर ५१, मोर्शी ७, वरूड ९, अंजनगाव सुर्जी ९, अचलपूर २, धारणी १ व चिखलदरा ५ अशा २७८ घरांचे अंशत: नुकसान झाले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३, वरूड १, अंजनगाव १ अशी पाच घरे पूर्णत: कोलमडली.

पर्यटकांची उसळली गर्दीधरणाचे दारे केव्हा उघडतात, याची प्रतीक्षा जिल्ह्यातीलच नव्हे, तर विदर्भातील नागरिकांना असते. त्यामुळे १३ दारे उघडण्यात आल्याची वार्ता पसरताच पर्यटक आणि वाहनांची गर्दी सकाळपासून झाली. उपविभागीय अभियंता रमण लायचा, शाखा अभियंता गजानन साने व अप्पर वर्धा धरणाचे कर्मचारी दत्तू फंदे लक्ष ठेवून आहेत. 

नदीकाठावरील गावांना इशारा अप्पर वर्धा धरण प्रशासनाच्या वतीने नदीकाठी येणाऱ्या गावांना हाय  अलर्ट जारी करण्यात आला आहे. धरणाचे पाणी नदीत ओसंडून वाहत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण