शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

बाबा, आम्ही पडक्या शाळेत जाणार नाही!

By admin | Updated: June 28, 2015 00:31 IST

एकीकडे जिल्हाभरात नवागत विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ शासनाच्या आदेशान्वये उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांचा पवित्रा : असदपूरच्या जि.प. उर्दू शाळेवर बहिष्कार, जीर्ण इमारत, अव्यवस्थाविश्वास चऱ्हाटे असदपूरएकीकडे जिल्हाभरात नवागत विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ शासनाच्या आदेशान्वये उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु असदपूर येथील ऊर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील ‘स्वागत’ नाकारून चक्क शाळेवर बहिष्कार टाकला. पडक्या, नादुरूस्त आणि सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या शाळेत आम्ही कदापि शिक्षण घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस या विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला नाही.असदपूर येते जि.प.ची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची ऊर्दू शाळा आहे. विद्यार्थी संख्याही बरीच आहे. परंतु या शाळेची इमारत जीर्ण झाली असून ती केव्हाही कोसळू शकते. शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत. छप्पर ठिकठिकाणी गळते. गत वर्षी १६ आॅगस्ट रोजी या शाळेची मोठी भिंत कोसळली होती. त्यावेळी सुदैवाने प्राणहानी टळली. मात्र, त्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली नाही. या शाळेची अवस्था अद्यापही सुधारलेली नाही. ही भिंत कोसळण्यापूर्वीसुध्दा शाळा व्यवस्थापन समितीने संबंधित विभागाला निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. मागील तीन वर्षांपासून पालक व विद्यार्थी शिक्षण विभागाला आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहेत. शेवटी पालक व विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. २६ जून रोजी शालेय सत्राच्या पहिल्या दिवशी एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही. पडक्या शाळेत आमची मुले पाठवून आम्ही त्यांच्या जीवाला धोका पोहोचविणार नाही, असे पालकांचे म्हणणे आहे.