शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमात बदल अन् कर्तव्यपूर्तीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:01 IST

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘प्रेस द मीट’मध्ये ते बोलत होते. कुुलगुरु डॉ. मालखेडे यांनी अभ्यासक्रमात बदल करताना महाविद्यालये आणि विद्यापीठाने त्यांची कर्तव्यपूर्ती करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या विद्यापीठातून पदवी घेतली, त्याच विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून जबाबदारी हाताळताना आनंदी आहे. पण, भूमिपुत्र म्हणून या विद्यापीठाचे ऋणदेखील फेडायचे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता अमुक अभ्यासक्रम घेऊन शिक्षण घेणे बंधनकारक नाही. कला, वाणिज्य, विज्ञान अथवा  अभियांत्रिकी अशा कोणत्याही शाखांमधील अभ्यासक्रमाचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ही बाब शक्य असून, येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच जुलै २०२२ पासून ही संधी विद्यार्थ्यांना मिळेल, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांनी मंगळवारी येथे दिली. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘प्रेस द मीट’मध्ये ते बोलत होते. कुुलगुरु डॉ. मालखेडे यांनी अभ्यासक्रमात बदल करताना महाविद्यालये आणि विद्यापीठाने त्यांची कर्तव्यपूर्ती करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या विद्यापीठातून पदवी घेतली, त्याच विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून जबाबदारी हाताळताना आनंदी आहे. पण, भूमिपुत्र म्हणून या विद्यापीठाचे ऋणदेखील फेडायचे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संवाद आनंददायी असावा, यासाठी महाविद्यालयांना कर्तव्य पार पाडावे लागेल. दरवर्षी लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, पदवी घेणाऱ्यांची संख्या ५० टक्केच आहे, ही बाब गंभीर असल्याबाबत त्यांनी लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय स्तरानुसार गुणांकन प्रणाली लागू होत असून, क्रेडिट सिस्टीम, ग्रेड मार्क प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. तसेच कोणत्याही कारणास्तव अर्धवट शिक्षण सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. मायनर डिग्री, संशोधन कार्य वाढविण्यासाठी अनुदानात वाढ केली जाणार असल्याचे कुलगुरुंनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल उपस्थित होते.

चांगला माणूस घडविण्याचा प्रयत्नसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अभ्यासक्रमात आणले जातील. त्यानुसार तयारी केली आहे. व्हॅल्यू एज्युकेशनद्धारे चांगला माणूस घडविण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न असेल. अमानवी कृत्ये होणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रम राहणार असल्याची ग्वाही कुलगुरु डॉ. मालखेडे यांनी दिली. 

पदव्युत्तर प्रवेशासाठी केंद्रीय प्रणालीअमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेशासाठी यापुढे केंद्रीय प्रवेश प्रणाली असणार आहे. त्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागेल. प्रवेशासाठी तीन फेरी होतील. यातून पारदर्शकता आणि महाविद्यालयाची माहिती स्पष्ट होईल, असे कुलगुरु डॉ. मालखेडे म्हणाले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र