शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीशिवाय बांधकाम केल्यास फौजदारी

By admin | Updated: October 16, 2015 00:39 IST

शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही दररोज होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत.

आदेश : ले-आऊटधारकांनासुध्दा वृक्षलागवड बंधनकारकचांदूरबाजार : शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही दररोज होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत. ले-आऊटला परवानगी देण्यापूर्वी अकृषक प्लॉटच्या सर्व बाजूंनी तसेच घरे बांधताना घरासमोर वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही. शिवाय ज्यांनी बांधकामापूर्वी वृक्ष लागवड केलेली नाही, त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेग्रामीण भागात शेतांच्या धुऱ्यावरील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लाकूडतस्करीही वाढली आहे. प्रशासनातील अधिकारी यातून मालामाल होत आहेत. विशेषत: शहराच्या बाजूला ले-आऊट टाकताना झाडांची कत्तल केली जाते. हे ले-आऊट टाकण्याकरिता जमीन अकृषक करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परवानगीकरिता अर्ज करण्यात येतो. शहरात घरे बांधताना नगरपरिषदेची व ग्रामीण भागात घराचे बांधकाम करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अनिवार्य आहे. समिती करणार देखरेखबांधकामापूर्वी झाडे लावली जातात की नाही, हे तपासण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्त समिती अध्यक्ष यांची समिती नेमली जाईल. शहरी भागात बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीच्या पदाधिकाऱ्यांची समिती यासाठी गठित केली जाईल. संबंधिताने घर बांधणीपूर्वी वृक्ष लागवड केली किंवा नाही, याचा अहवाल या समितीला तपासून घ्यावा लागेल. तपासणीअंती संबंधित यंत्रणेने वृक्ष लागवडीपूर्वीच बांधकामाला परवानगी दिली असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावले जाईल. त्यानंतर त्यांचे निलंबन केले जाईल. (प्रतिनिधी)वृक्ष लागवडीचे जोडावे लागणार प्रमाणपत्रबांधकामाच्या परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी, नगरपरिषद, ग्रामपंचायतीकडे अर्ज करताना रिकाम्या जागेत वृक्षलागवड केल्याचे प्रमाणपत्र व वृक्षारोपणाचे छायाचित्रदेखील जोडावे लागणार आहे. लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे शपथपत्रदेखील बांधकामाच्या परवानगीसाठी गरजेचे असणार आहे. परवानगी दिल्यानंतर वर्षभरात संबंधित यंत्रणा लावलेल्या झाडांची पाहणी करेल. पाहणीदरम्यान झाडे आढळून आली नाहीत तर चौकशी करुन संबंधित घरमालकाविरूध्द पोलीस ठाण्यात फौजदारी कारवाईसंबंधी तक्रार केली जाईल.