शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

फेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST

अमरावती जिल्ह्यात पसरविल्या जात असलेल्या अशाच एका फेक मेसेजला ‘अमरावती कलेक्टरकडून सूचना’ असा मथळा असून, शेवटी ‘जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती’ असा उल्लेख आहे. कोरानाकाळात काय करावे आणि काय करू नये, कुठल्या वस्तू वापराव्यात आणि कुठल्या वापरू नये, यासंबंधीची माहिती त्या मेसेजमध्ये आहे.

ठळक मुद्देशोध सुरू : जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या पदनामाचा गैरवापर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाची दिशाभूल करणारे आणि अफवा पसरविणारे मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न काही अपप्रवृत्तींकडून केला जात आहे. अशा व्यक्तींवर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.अमरावती जिल्ह्यात पसरविल्या जात असलेल्या अशाच एका फेक मेसेजला ‘अमरावती कलेक्टरकडून सूचना’ असा मथळा असून, शेवटी ‘जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती’ असा उल्लेख आहे. कोरानाकाळात काय करावे आणि काय करू नये, कुठल्या वस्तू वापराव्यात आणि कुठल्या वापरू नये, यासंबंधीची माहिती त्या मेसेजमध्ये आहे. त्यातील माहिती दिशाभूल करणारी आणि अशास्त्रीय आहे. 'तो' मेसेज जिल्हाधिकाऱ्यांनी वा जिल्हा माहिती कार्यालयाने जारी केला नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.प्रशासनाच्या नावाने दिशाभूल करणाऱ्यां व्यक्तींचा शोध पोलीस घेत असून त्यांच्यावर लवकरच फौजदारी कारवाई केली जाणार आहे. दिशाभूल करणारे, भीती निर्माण करणारे, घबराट पसरविणारे मेसेज नागरिकांनी फॉर्वर्ड करू नये. तोदेखील गुन्हा ठरतो. तसे मेसेज आढळल्यास प्रशासनाला त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.फेक मेसेजमध्ये काय?कोरोना तिसऱ्या टप्प्यात जाणार असल्याचा उल्लेख करून वृत्तपत्र बंद करा, ब्रेड-पाव किंवा बेकरी साहित्य बंद करा, शेजाऱ्यांना येऊ देऊ नका, सर्वच गरजांसाठी गरम पाणी वापरा, अशा टिप्स त्यात दिल्या आहेत. त्याशिवाय आणखी बऱ्याच बाबी लिहिल्या आहेत. त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. मात्र, अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. ते फॉरवर्ड करू नका. समाज माध्यमांवर दिशाभूल करणारे, अफवा पसरविणारे मेसेज आल्यास पोलीस वा जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.वृत्तपत्रे सुरक्षितच!वृत्तपत्रे बंद करण्याचे आदेश नाहीत. उलटपक्षी वृत्तपत्रांचा अत्यावश्यक सेवेत समावेश आहे. वृत्तपत्रे सुरक्षित असून, त्यातून कोरानाचा प्रसार होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने, शासनाने आणि प्रशासनाने तसे स्पष्टच केले आहे. जिल्ह्यातील कोविड फायटर आणि इतर अनेक डॉक्टर्सही वृत्तपत्रे वाचूनच त्यांच्या दिनक्रमाची सुरुवात करतात.

टॅग्स :onlineऑनलाइन