शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी आज; मतदारांचा कौल कुणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

मंगळवारी मतदान झाल्यानंतर रात्री ८ च्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांनी मतदान ८२.९१ टक्के झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. पाचही जिल्ह्यांतून सर्व मतपेट्या येथील विलासनगरातील सुरक्षा कक्षात जमा करण्यात आल्यानंतर अंतिम मतदारसंख्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली. यानुसार विभागातील एकूण ३५,६२२ मतदारांपैकी २३,१६६ पुरुष व ७,७३० स्त्री मतदार, असे एकूण ३०,८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही अंतिम टक्केवारी ८६.७३ आहे.

ठळक मुद्दे८६.७३ टक्के उच्चांकी मतदान; पसंतीचा दुसरा क्रम निर्णायक, उमेदवारांची वाढली धडधड, उशिरापर्यंत येणार निकाल

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी विक्रमी ८६.७३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी जाहीर केले. या वाढीव मतदानाचा कौल कुणाला, याविषयी चांगलीच चर्चा रंगात आलेली आहे. यासोबतच मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही पसंतीचा दुसरा क्रम निर्णायक ठरणार असल्याचे शिक्षक मतदारांमध्ये बोलले जात आहे.मंगळवारी मतदान झाल्यानंतर रात्री ८ च्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांनी मतदान ८२.९१ टक्के झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. पाचही जिल्ह्यांतून सर्व मतपेट्या येथील विलासनगरातील सुरक्षा कक्षात जमा करण्यात आल्यानंतर अंतिम मतदारसंख्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली. यानुसार विभागातील एकूण ३५,६२२ मतदारांपैकी २३,१६६ पुरुष व ७,७३० स्त्री मतदार, असे एकूण ३०,८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही अंतिम टक्केवारी ८६.७३ आहे. अमरावती जिल्ह्यात ८६३६ (८३.१५ टक्के) मतदान झाले. अकोला जिल्ह्यात ५,४६५ (८४.३४ टक्के), वाशिम जिल्ह्यात ३,४८८ (९१.८४ टक्के), बुलडाणा जिल्ह्यात ६,७३० (८९.१८ टक्के), तर यवतमाळ जिल्ह्यात ६,५७७ (८८.१८ टक्के) मतदान झाले. यामध्ये पुरुष मतदानाचा टक्का ८८.८९ व स्त्री मतदानाचा टक्का ८०.८४ राहिला.  

असा ठरणार विजयी मतांचा कोटामतमोजणीसाठी पहिल्या सहा राऊंडमध्ये फक्त एकूण मतपत्रिका मोजल्या जातील व  अवैध बाहेर काढल्या जातील. शिल्लक वैध मतपत्रिकांची संख्या भागिले दोन अधिक एक असे विजयी मतांचे सूत्र आहे. यात पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराने कोटा पूर्ण न केल्यास दुसरा पसंतीक्रम मोजला जातो. यात सर्वांत कमी पसंतिक्रम असलेला उमेदवार बाद होतो व त्याच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते त्या-त्या उमेदवाराला दिली जातात.

अशी होणार मतमोजणी  येथील विलासनगरातील  गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यात एका हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांच्या नियंत्रणात सात टेबल व दुसऱ्या हॉलमध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्या नियंत्रणात सात टेबल राहतील. प्रथम २७ पोस्टल बॅलेटची मोजणी होईल व त्यानंतर सर्व मतपत्रिकांची सरमिसळ केल्यानंतर २५ मतपत्रिकांचे ४० बंडल (१००० मतपत्रिका) याला सहा फेऱ्या लागतील. यानंतर १४ टेबलवर प्रत्येकी एक हजार मतपत्रिकांचे पसंतिक्रम काढले जातील. यालाही तीन फेऱ्या लागतील.

मतमोजणी स्थळी असा असेल पोलीस बंदोबस्तअमरावतीत स्थित विलासनगरातील शासकीय गोदामात शिक्षक मतदारसंघाची गुरुवारी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने या भागात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यात राज्य राखीव पाेलीस दलाची एक तुकडी, पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, चार पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, तर वाहतूक शाखेचे चार अधिकारी, २० पोलीस कर्मचारी व होमगार्ड तौनात राहणार आहेत.

पाया पडल्याने महिला उमेदवाराविरुद्ध गुन्हामतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत प्रवेश व मतदान केंद्र परिसरात शिक्षक मतदारांच्या पाया पडून निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महिला उमेदवाराविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. नायब तहसीलदार तथा केंद्राधिकारी म्हणून कार्यरत गोपाल कडू यांनी यासंदर्भात तक्रार नोंदविली. महिला उमेदवारावर पोलिसांनी भादंविचे कलम १३०, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ नुसार गुन्हा दाखल केला. कॅम्प स्थित मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.

टॅग्स :Electionनिवडणूक