शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

कापूस केवळ 5200 रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:01 IST

यावर्षी कापसाचे भाव वाढतील, या अंदाजाने अनेक शेतकऱ्यांनी  कापूस घरात साठवून ठेवला, तर गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने कापसाची विक्री सुरू केली आहे.  चांदूर बाजार तालुका हा दर्जेदार कापसासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस लांब धाग्याचा आहे.   गतवर्षी सोयाबीनने दगा दिल्याने यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, यावर्षी सर्वच पिकांवर सुरुवातीलाच निरनिराळे रोग आले. कपाशी पिकावरसुद्धा रोगाचे सावट आले होते.

ठळक मुद्देदर कोसळले : शेतकरी चिंतेत; पेरणी ते वेचणीपर्यंत खर्च आवाक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन उत्पादन करणारा शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. आता खुल्या बाजारात कापसाचे दर पडल्याने पेरणीपासून वेचणीला लागलेला खर्च निघणार कसा, या चिंतेने  कापूसउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. खासगी बाजारात कापसाला प्रतिक्विंटल केवळ ५२०० रुपये भाव मिळत आहे. यावर्षी कापसाचे भाव वाढतील, या अंदाजाने अनेक शेतकऱ्यांनी  कापूस घरात साठवून ठेवला, तर गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने कापसाची विक्री सुरू केली आहे.  चांदूर बाजार तालुका हा दर्जेदार कापसासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस लांब धाग्याचा आहे.  गतवर्षी सोयाबीनने दगा दिल्याने यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, यावर्षी सर्वच पिकांवर सुरुवातीलाच निरनिराळे रोग आले. कपाशी पिकावरसुद्धा रोगाचे सावट आले होते.  यामुळे पेरणीपासून तर कापूस वेचणीपर्यंत शेतकऱ्यांना अवाढव्य खर्च आला आहे. तथापि, दर ५ हजार २५० रुपयांवर स्थिर असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. वर्षभराचा उदीम ज्या पिकाच्या भरवशावर, त्यात फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकरी हवालदील आहेत.

अर्थकारण बिघडलेकपाशीला कमाल ५, ३२५ रुपये, तर किमान ५ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी चार ते पाच वर्षे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला. परंतु, पिकाला योग्य दर मिळत नव्हता. म्हणून शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड वाढविली. गतवर्षी ५ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिकचा भाव  कपाशीला मिळाला. नंतर हे दर ६ हजार ५०० रुपयापर्यंत पोहोचले. मात्र, आता बाजारपेठेत कापसाचे भाव पडले आहेत.  यावर्षी कापूस वेचणीसाठीसुद्धा मजुरांचे दर वाढल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन कमी व खर्च अधिक करावा लागला. सबब, शेतीचे अर्थकारणच बिघडले. 

 

टॅग्स :cottonकापूस