लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 21:15 IST2020-09-09T21:13:44+5:302020-09-09T21:15:48+5:30

१५ हजार लाच स्विकारली : पंचायत समितीसमोर सापळा

Corrupt extension officers arrested by ACB amaravati | लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

तिवसा : तालुक्यातील वऱ्हा येथे केलेले बांधकाम व प्रलंबित देयके काढून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. संजय गणपतराव भेलावू (५२) असे अटक आरोपीचे नाव असून ते तिवसा पंचायत समितीत विस्तार अधिकारी (सांख्यिकी) म्हणून कार्यरत आहेत. स्थानिक तिवसा पंचायत समिती कार्यालयात ९ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. 

तक्रारदार वऱ्हा येथील रहिवाशी आहेत. नागरी सुविधेअंतर्गतचे बांधकाम व चौदाव्या वित्तआयोगांतर्गत सिमेंट रोड, नाली, फेनसिंग, पेविंग ब्लॉक इत्यादी बांधकामाचे  देयक मंजूर केल्याच्या मोबदल्यात व प्रलंबित देयक देण्याकरिता त्यांना भेलाऊ यांने १५ हजार रुपये लाच मागितली. ती स्विकारताना त्याला रंगहाथ पकडण्यात आले. एसीबीच्या अमरावती घटकाने ही कारवाई केली.

Web Title: Corrupt extension officers arrested by ACB amaravati