शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

coronavirus : खासदार, आमदारांनी केली कलेक्टर, सीएसची तक्रार, लोकप्रतिनिधींचेच हे हाल, सामान्यांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:26 PM

आमदार व खासदारांचे नमुने सदोष घेण्यात आले असतील, तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा सवाल आमदार राणांनी या तक्रारीमध्ये केला आहे.

अमरावती - जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह असताना कोरोनाविषयी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी गंभीर नाहीत. ते केबिनबाहेर निघत नाहीत. आमदार व खासदारांचे सॅम्पल रिजेक्ट झाले आहेत. अप्रशिक्षित कर्मचारी  थ्रोट स्वॅब घेतात. एकूण जिल्ह्याची यंत्रणाच बिघडली आहे. कोरोना रोखण्यास हे दोन्ही अधिकारी अयशस्वी ठरले आहेत, अशी तक्रार आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोमवारी केली. खासदार नवनीत राणा यांनीही टष्ट्वीट केले.सलग तीन दिवस तापाने फणफणलेले व उपचारार्थ एका खासगी रुग्णालयात दाखल झालेले आमदार रवि राणा व त्यांच्या संपर्कात असलेल्या खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब सदोष घेण्यात आल्याने नागपूरच्या ‘एम्स’ लॅबने नाकारले. आमदार व खासदारांचे नमुने सदोष घेण्यात आले असतील, तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा सवाल आमदार राणांनी या तक्रारीमध्ये केला आहे. त्यांनी थ्रोट स्वॅब घेण्याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांना फोन केल्यानंतर दोन दिवसांनी तो घेण्यात आला. नमुने घेण्यासाठी आलेले कर्मचारीदेखील अप्रशिक्षित होते. जे ग्लोव्ह्ज घालून आमदारांचा स्वॅब कर्मचाºयांनी घेतला, तेच कायम ठेवून खासदार नवनीत राणा यांचा स्वॅब घेतला. या कर्मचा-याचे हातदेखील थरथरत होते. एकूण या प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने नमुने घेण्यात आल्यानेच लॅबने नाकारल्याची तक्रार आमदार राणा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून केली. नमुने चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचे ‘एम्स’ लॅबच्या डॉ. मिणा यांनी सांगितले. किंबहुना अमरावती येथून बरेचसे नमुने चुकीच्या पद्धतीने घेतली जातात. त्यामुळे ४० हून अधिक नमुने नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याचे आमदारांनी आरोग्यमंत्र्यांना सांगितले. याविषयी खुद्द आरोग्यमंत्र्यांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी देखील आमदार राणा यांनी केली.दोन्ही अधिकारी केबिनबाहेर केव्हा निघणार?४जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम हे दोन्ही अधिकारी केबिनबाहेर निघत नाहीत. अधिकाºयांना जे प्रशिक्षण दिले, त्याचे पालन होत नाही. येथे व्यक्ती मृत झाल्यावर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळतो. मुळात अधिकारीच कोरोनाविषयी गंभीर नाहीत. जिल्ह्याची यंत्रणाच बिघडली आहे. आमदाराचे थ्रोट स्वॅब घेण्यासाठी अप्रशिक्षित कर्मचाºयाला पाठविले जाते; जिल्हा शल्यचिकित्सक येत नाहीत, असा आरोप आमदार राणा यांनी आरोग्यमंत्र्यांशी बोलताना केला.राणा दाम्पत्याचे नमुने निगेटिव्ह४आमदार व खासदार राणा दाम्पत्यांचे शनिवारी घेण्यात आलेले नमुन्यांचा अहवाल जिल्हा यंत्रणेपूर्वी त्यांनी ‘एम्स’च्या डॉ. मीना यांच्याकडून जाणून घेतला. नमुने रिजेक्ट केल्याचे ऐकून राणा दांपत्य ‘शॉक’ झाले. पुन्हा रविवारी थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले. त्यावेळी नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने जीव भांड्यात पडला. आमदार व खासदाराबाबत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा गंभीर नाही तेव्हा सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल राणा दाम्पत्याने आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्याकडे केला.आरोग्य यंत्रणेचे काम चांगले - पालकमंत्री४जिल्ह्यातील चार संक्रमित कोरोनाग्रस्तांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. जिल्ह्यातील डॉक्टर, नर्सेस, सुपरव्हायझिंग यंत्रणा जिवाची पर्वा न करता काम करीत आहे, याचेच हे द्योतक आहे, असे म्हणत जिल्ह्याचे पालक या नात्याचे ना. यशोमती ठाकूर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. ना. बच्चू कडू यांचे थ्रोट स्वॅब दोन वेळा घ्यावे लागले. त्यांनी कुठलीच आरडाओरड केली नाही किंवा यंत्रणेवर दबाव आणला नाही. जिल्ह्यात कोरोना नमुने तपासणीच्या दोन लॅब विद्यापीठ व पीडीएमसी येथे सुरू होत आहे. यामध्ये आधी कोणती सुरू होते, यावर राजकारण केले जात आहे. जो प्रस्ताव आधी, तिथे पहिली लॅब व त्यानंतर लगेच दुसरी सुरू होईल, असे ना. ठाकूर म्हणाल्या.  सुरक्षित स्वॅब घेण्याची व्यवस्था कोविडमध्ये४सुरक्षितपणे थ्रोट स्वॅब घेण्याची व्यवस्था कोविड रुग्णालयात आहे. आमदार व खासदार राणा दाम्पत्यांच्या विनंतीवरून ते दाखल असलेल्या एका खासगी रुग्णालयातून त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे नागपूरच्या लॅबने नमुना पुन्हा घ्यायला सांगितले. त्याप्रमाणे तो घेऊन पाठविण्यात आला, याचा उल्लेख करीत जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, हेल्थ वर्कर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत सर्व डॉक्टरांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सोमवारी निवेदन दिले. खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी संवादाची क्लिप माध्यमांवर व्हायरल केली; त्याचा निषेध निवेदनात करण्यात आला.सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचे स्वॅब नियमित पाठविले जातात. कधी-कधी रिपीट पाठवावे लागतात. येथे कोरोनाचा ‘डेथ रेट’ कमी आहे; नॉन कोविड डेथ आहेत. चार पॉझिटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह आलेल्या आहेत. यंत्रणेचे मनोबल सर्वांनी वाढवायला पाहिजे. सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यात कोरोनावर मात करूया.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारीजिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींविषयी आम्हा सर्वांना आदरच आहे. सध्याच्या कठीण समयी जिवाची पर्वा न करता काम करणाºया आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाºयांविरुद्ध ताशेरे ओढणे ही खेदाची बाब आहे. त्यांची हिंमत वाढविण्याची या काळात गरज असताना, असा प्रकार झाल्याने त्यांच्या मनोधैर्यावर फरक पडतो.- डॉ. श्यामसुंदर निकम,  जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावतीRavi Ranaरवी राणा