पाळा येथे कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST2021-02-05T05:34:03+5:302021-02-05T05:34:03+5:30

मोर्शी : प्रजासत्ताक दिनी पाळा येथील जिल्हा परिषद शाळेत कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेंद्र जिचकार यांच्या हस्ते कोरोनायोद्ध्यांचा सत्कार ...

Coronation warriors felicitated at Pala | पाळा येथे कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

पाळा येथे कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

मोर्शी : प्रजासत्ताक दिनी पाळा येथील जिल्हा परिषद शाळेत कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेंद्र जिचकार यांच्या हस्ते कोरोनायोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अंगणवाडी सेविका नंदा भाऊराव दंडाळे, प्रतिभा विठ्ठलराव तोटे, जयमाला विजय कुकडे, प्रेमलता प्रवीण धलवार, आशा वर्कर किरण सुनील नेवारे, शोभा राजू कोकोडे, इंदू महादेव दंडाळे, पुष्पलता विजय नागले, पाळा व सालबर्डी येथील पोलीस पाटील अनुक्रमे सागर साठे व सादिक पटेल तसेच पाळा येथील तलाठी आशिष सावरकर, कृषिसहायक किशोर राऊत, अंगणवाडी मदतनीस मंदा गौतम हरले, सिंधू वासुदेव गायकवाड, रीता बाबाराव कवडे तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रमोद कपले यांना शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच, उपसरपंच, शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सदस्य, अविरोध निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Coronation warriors felicitated at Pala