शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेला कोरोनाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

६,५४,५१६ लाभार्थी; कोविड १९ संसर्गामुळे वाटप स्थगित अमरावती:बालकांमधील रक्तक्षय व कृमी दोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात १ ते १९ ...

६,५४,५१६ लाभार्थी; कोविड १९ संसर्गामुळे वाटप स्थगित

अमरावती:बालकांमधील रक्तक्षय व कृमी दोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात १ ते १९ वर्षे वयोगटातील ६ लाख ५४ हजार ५१६ लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्याची मोहीम १ मार्चपासून जिल्ह्यात सुरू होणार हाेती; परंतु सध्या काेरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ही मोहीम तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.

वैयक्तिक व परिसरातील स्वच्छतेच्या अभावामुळे लहान मुलांच्या पोटात कृमी होतात. आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून धोका असतो. त्यामुळे बालकांना कमजोरी येते. रक्तक्षय, कुपोषित बालकांची बौद्धिक, शारीरिक वाढ खुंटते. जंतांमुळे बालकांना त्रास होऊ नये यासाठी जंतनाशक गोळ्या वाटप मोहीम जिल्ह्यात १ मार्चपासून राबविण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्या होत्या. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नियोजन सुध्दा केले आहे, परंतु सध्या शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने रुग्ण संख्याही वाढत आहे.परिणामी जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम सध्या स्थगित करण्याची विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या आरोग्य विभागाकडे झेडपी आरोग्य विभागाने केली आहे. त्यानुसार ही मोहीम जिल्ह्यात कोरोनामुळे तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर ही मोहीम जिल्ह्यात राबविली जाणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बॉक्स

२४९० कर्मचाऱ्यांची फौज

जंतनाशक गोळ्या वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील २ हजार ४९० आशा सेविका, ९९ आरोग्य सहायक,२६९ एमपीडब्लू आदी कर्मचाऱ्यांची फौज यासाठी नियुक्त करण्यात आली आहे.याशिवाय १८ पर्यवेक्षकसुद्धा नेमले आहेत. जंतनाशक गोळ्या वाटपासाठी आरोग्य विभागाने नियोजनही तयार केले आहे; मात्र तूर्तास ही मोहीम स्थगित केली आहे.

बॉक्स

कोरोनाचा अडसर

जिल्ह्यात जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे आरोग्य विभागाने नियोजन तयार आहे,परंतु शहरासह जिल्हाभरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्या शाळा, महाविद्यालय सुद्धा बंद आहेत. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यास अडचणी असल्यामुळे एक मार्चपासून राबविण्यात येणारी जंतनाशक गोळ्यांचे वाटपाची मोहीम तूर्तास काही दिवस लांबणीवर टाकण्यात आली आहे.

कोट

जिल्ह्यात १ ते १९ वर्षे वयोगटातील ६ लाखांवर बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याची मोहीम राबविण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग अधिक असल्यामुळे ही मोहीम स्थगित केली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाईल.

डॉ.दिलीप रणमले

जिल्हा आरोग्य अधिकारी

बॉक्स

लाभार्थी संख्या

डीएचओ अंतर्गत -५३२२६२

सीएस अंतर्गत- १२२२५४