शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने महिला दगावली, बेस्ट हॉस्पिटलची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

शबाना अंजूम (४५, रा. अचलपूर) असे मृतक महिलेचे नाव असून २७ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी ९.३० वाजताच्या सुमारास महिला दगावली. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास नातेवाईक संतप्त झाले. हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली. त्यानंतर काही नातेवाईकांनी व सामजिक कार्यकर्यांनी संतप्त होत डॉक्टर सोहेल बारी व हॉस्पिटल प्रशासनावर संताप व्यक्त करीत हॉस्पिटलची तोडफोड केली.

ठळक मुद्देनातेवाईक संतप्त, गाडगेनगर ठाणे हद्दीतील घटना, परस्पर विरोधी तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील नागपुरीगेट परिसरात असलेल्या बेस्ट मल्टिस्पेशालिटी कोविड हॉस्पिटल येथे २२ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या अचलपूर येथील महिलाचा शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कोरोनाने मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिला दगावली, असा आरोप नातेवाईकांनी करीत हॉस्पिटलमध्ये कोविड कक्षात जाऊन तोडफोड केली. याप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध महिलेच्या पतीने  गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविल्याचे पोलिसांनी सांगितले.
शबाना अंजूम (४५, रा. अचलपूर) असे मृतक महिलेचे नाव असून २७ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी ९.३० वाजताच्या सुमारास महिला दगावली. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास नातेवाईक संतप्त झाले. हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली. त्यानंतर काही नातेवाईकांनी व सामजिक कार्यकर्यांनी संतप्त होत डॉक्टर सोहेल बारी व हॉस्पिटल प्रशासनावर संताप व्यक्त करीत हॉस्पिटलची तोडफोड केली. पोलिसांना माहिती मिळताच गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. तसेच क्युआरटी पथकसुद्धा घटनास्थळावर दाखल झाले. गाडगेनगरचे वरिष्ठ पीआय आसाराम चोरमले, पीआय मोहन कदम व पोलिसांच्या ताफ्याने घटनास्थळावर नियंत्रण मिळविले. नातेवाईकांची समजूत काढून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना केला. 

२२ दिवसांपासून महिलेवर उपचार सुरू आहे. महिलेची प्रकृती आधीपासूनच चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर लावले होते. आम्ही महिलेला वाचविण्याचे पूर्ण प्रयत्न केले. तोडफोड ही नातेवाईकांनी नाहीतर बाहेरील लोकांनी केली. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविणार आहे.
- डॉ. सोहेल बारी, संचालक बेस्ट हॉस्पिटल अमरावती

मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दिली. परंतु, नियमानुसार डॉक्टरांवर गुन्हा नोंदविता येत नाही. सदर प्रकरण जिल्हा शल्यचिकित्सकांच्या समितीकडे पाठविण्यात येईल. रुग्णालयाची तोडफोड केल्याप्रकरणी डॉक्टरांनी तक्रार दिली असून, आठ ते नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येईल. 
- आसाराम चोरमले,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या