शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

सेफ झोनमध्येही कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:00 AM

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत आहे. कंटेनमेंटमधून नागरिकांचे आवागमन सुरूच आहे. पोलीस यंत्रणा त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहे. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नाही. राज्यातील रेड झोनमधून आलेले नागरिक शहरात मिसळत असल्याने धोका वाढला आहे. यादरम्यान बाधिताच्या घराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपुन्हा पाच, एकूण १९१ : दसरा मैदान, शोभानगर भागात नव्या रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात कोरोनाग्रस्तांचा आलेख चढताच आहे. रोज नव्या भागात कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी दोन टप्प्यात प्राप्त अहवालात पुन्हा पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १९१ वर पोहोचली आहे.मसानगंज या हॉटस्पॉटमध्ये पुन्हा दोन संक्रमित आढळले. ३० वर्षीय महिला व ५० वर्षीय पुरुषाचा यामध्ये समावेश आहे. याव्यतिरिक्त दसरा मैदान या नव्या भागात २६ वर्षीय कामगाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या तरुणाची काँटॅक्ट हिस्ट्री अद्याप आरोग्य यंत्रणेला मिळालेली नाही. या मैदानालगत असलेल्या झोपडपट्टीतील तो रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. कंटेनमेंट झोन असलेल्या हनुमाननगरात बाधितांच्या संपर्कात असलेल्या ३५ वर्षीय महिला व शोभानगरात ६४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. रोज नवीन भागात कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने आता नमुन्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत आहे. कंटेनमेंटमधून नागरिकांचे आवागमन सुरूच आहे. पोलीस यंत्रणा त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहे. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नाही. राज्यातील रेड झोनमधून आलेले नागरिक शहरात मिसळत असल्याने धोका वाढला आहे. यादरम्यान बाधिताच्या घराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या भागात आरोग्य यंत्रणांद्वारे गृहभेटी दिल्या जात आहे. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दसरा मैदान हे नवे कंटेनमेंट झोन घोषित करून उपाययोजना लागू केल्या आहेत.‘त्या’ अटेंडंटच्या संपर्कातील दोन बाधितमहापालिकेच्या मसानगंज येथील आरोग्य केंद्रात अटेंडंट संक्रमित झालेला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या घरालगतच्या दोन व्यक्तींचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे. यादरम्यान मसानगंज या हॉटस्पॉटमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३० वर पोहोचली. आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी औषधांचे वाटप येथे होत आहे. महापालिकेसह पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याचा आरोप आता होत आहे.बुधवारी पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मसानगंजमधील ‘त्या’ अटेंडंटच्या संपर्कातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. या भागात होमिओपॅथी औषधांचे वाटप सुरू आहे.- डॉ विशाल काळेवैद्यकीय आरोग्य अधिकारीमहापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या